नसरापूरच्या चिमुकलीवरील अत्याचाराचे विरोधात सकल हिंदू समाजाचा निषेध मोर्चा
सोमवार, ४ मे, २०२६
Edit
बारामती: नसरापूर येथे अजाण चिमुकलीवर अत्याचार व खून करणाऱ्या आरोपीच्या विरोधात बारामतीत सकल हिदू समाजाच्या वतीने संतोष लोणकर यांचे नेतृत्वात ३ मे रविवार रोजी सायंकाळी जाहीर मुक निषेध मोर्चा काढण्यात आला.
यावेळी झालेल्या सभेत विविध वक्त्यांनी भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली.४वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करुन तिचा क्रूरपणे जीव घेणाऱ्या आरोपीचा तीव्र निषेध करत आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा झालीच पाहिजे-चिमुकलीला न्याय मिळालाच पाहिजे अशी मागणी करण्यात आली.
नसरापूर येथे अमानुष अत्याचार व जीवितास बळी पडलेल्या चिमुकलीला न्याय मिळालाच पाहिजे आणि आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी या दुर्दैवी घटनेचा जाहीर निषेध मुक मोर्चा सकल हिंदू समाजाचे वतीने आयोजित करण्यात आला. यात ब्राम्हण संघटना,ज्येष्ठ नागरिक संघ व इतर संघटना सहभागी होत्या.
.jpeg)

.jpeg)