ग्रीन अँड क्लीन एमआयडीसी मोहिमेचा प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

ग्रीन अँड क्लीन एमआयडीसी मोहिमेचा प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

 

बारामती: बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून बारामती एमआयडीसी मध्ये ग्रीन अँड क्लीन एमआयडीसी या मोहिमेचा शुभारंभ एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, प्रदूषण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी कार्तिकेय लंगोटे, कार्यकारी अभियंता विजय पेठकर व बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार यांच्या संकल्पनेतून व एकत्रित प्रयत्नातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमासाठी सर्व कंपन्यांनी सहभाग घेतला असून स्वच्छता मोहीम वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतला आहे.

यावेळी उपाध्यक्ष मनोहर गावडे, सचिव अनंत अवचट, सदस्य संभाजी माने, खंडू गायकवाड, मनोज पोतेकर, हरीश खाडे, विष्णू दाभाडे, उपेंद्र गलांडे या सर्वांनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

यावेळी बोलताना हनुमंत पाटील व धनंजय जामदार यांनी सांगितले की, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार व विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या निरंतर प्रयत्नातून बारामती परिसरात व्यापक प्रमाणात वृक्ष लागवड व संवर्धन झालेले आहे. त्यात अधिक भर टाकत व परिसराच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष देऊन ग्रीन अँड क्लीन बारामती एमआयडीसी ही संकल्पना यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही हनुमंत पाटील, कार्तिकेय लंगोटे, विजय पेठकर व धनंजय जामदार यांनी यावेळी दिली.