"आमचा एकही खासदार फुटणार नाही"; मोजक्या शब्दांत उत्तर देत शरद पवारांनी व्यक्त केला विश्वास

"आमचा एकही खासदार फुटणार नाही"; मोजक्या शब्दांत उत्तर देत शरद पवारांनी व्यक्त केला विश्वास

 


बारामती : खासदार फुटणार असल्याच्या चर्चांना कोणताही आधार नसून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा एकही खासदार पक्ष सोडणार नाही, असा ठाम विश्वास ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केला. राजकीय घडामोडी आमच्या पक्षात घडणार नाहीत, असे स्पष्ट करत त्यांनी राजकीय चर्चांवर पूर्णविराम दिला.

शरद पवार गुरुवारी बारामती दौऱ्यावर आले होते. सकाळी गोविंदबाग येथील निवासस्थानातून बाहेर पडताना ते आणि युगेंद्र पवार एकाच वाहनातून रवाना झाले. यावेळी पत्रकारांनी पक्षांतराबाबत प्रश्न विचारला असता, पवार यांनी अत्यंत मोजक्या शब्दांत उत्तर देत पक्षातील खासदारांबाबत पूर्ण विश्वास व्यक्त केला.