उद्धवसेनेतील बंडखोर खासदारांची आज पत्रकार परिषद, भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी घडामोड घडण्याची चिन्हे दिसत आहेत. उद्धवसेनेतील सहा खासदारांच्या बंडाची आज औपचारिक घोषणा होण्याची शक्यता असून, त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला मोठा धक्का बसू शकतो.

मिळालेल्या माहितीनुसार, बंडखोर खासदार आज संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत ते लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासोबत झालेल्या बैठकीचे फोटो आणि व्हिडीओ सार्वजनिक करणार आहेत. तसेच अध्यक्षांना सादर करण्यात आलेल्या पत्राची कॉपीही माध्यमांसमोर मांडली जाणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटापासून वेगळे होण्यामागील कारणांचाही खुलासा या पत्रकार परिषदेत केला जाऊ शकतो.

उद्धवसेनेतील संभाव्य फुटीच्या चर्चांना उधाण आल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात वेगवान हालचाली सुरू झाल्या. संजय जाधव, संजय देशमुख, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे, नागेश पाटील आष्टीकर आणि संजय दिना पाटील हे सहा खासदार देशातील विविध भागांतून दिल्लीत दाखल झाले. दिल्लीजवळील नोएडामधील एका हॉटेलमध्ये मुक्काम केल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासोबत बैठक घेतल्याची माहिती समोर आली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकर यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. सकाळी १०.२० वाजता उर्वरित पाच खासदारांनीही लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन एक पत्र सादर केले. या पत्रात आपण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत विलीन होत असल्याचा दावा करण्यात आला असून, लोकसभेतील आसनव्यवस्था बदलण्याची विनंतीही करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

लोकसभा अध्यक्षांची भेट घेतल्यानंतर संबंधित खासदार चेन्नई, वाराणसी, पुणे आणि मुंबईसह विविध ठिकाणी रवाना झाले. आज होणाऱ्या पत्रकार परिषदेसाठी दोन खासदार चेन्नईहून, दोन कोलकाताहून मुंबईत पोहोचणार आहेत. एक खासदार आधीच मुंबईत असून, दुसरे पुण्यात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या पत्रकार परिषदेत नेमकी कोणती भूमिका मांडली जाते आणि उद्धवसेनेची त्यावर काय प्रतिक्रिया असेल? याकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सहा खासदारांच्या या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवे समीकरण निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.