पावसात पोल्ट्री फार्मचे नुकसान झाल्यास भरपाई कशी मिळवाल, जाणून घ्या सविस्तर

पावसात पोल्ट्री फार्मचे नुकसान झाल्यास भरपाई कशी मिळवाल, जाणून घ्या सविस्तर

 


मान्सूनपूर्व पाऊस सुरु झाला असून अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळतो आहे. अशा परिस्थितीत अनेक ठिकाणी नुकसान होते आहे. जर अशा वादळी पावसात तुमच्या पोल्ट्री फार्मचे नुकसान झाल्यास काय कराल किंवा नुकसान भरपाई मिळण्यासाठी काय केले पाहिजे, हे समजून घेऊयात... 

पंचनामा आणि तक्रार : स्थानिक ग्रामपंचायत, तलाठी, आणि पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून नुकसानाचे पंचनामे करून घ्या. मृत पक्षांचा आकडा आणि शेडच्या नुकसानाची लेखी नोंद अत्यंत महत्त्वाची आहे.

विमा दावा : जर तुम्ही 'प्रधानमंत्री फसल विमा योजना' किंवा एखाद्या खाजगी कंपनीकडून पोल्ट्री शेड आणि पक्षांचा विमा काढला असेल, तर त्वरित विमा कंपनीच्या टोल-फ्री क्रमांकावर कॉल करून नुकसान झाल्याची माहिती द्या. 

मदत आणि अर्ज : नुकसान भरपाईसाठी तहसील कार्यालय किंवा जिल्हा परिषद कृषी विभागाकडे विहित नमुन्यात त्वरित अर्ज सादर करा. 

कंपनीशी संपर्क : जर तुम्ही एखाद्या खाजगी कंपनीशी करारावर काम करत असाल, तर लगेच त्यांच्या सुपरवायझरला नुकसानाची माहिती द्या.