नसरापूर प्रकरणात मोठी घडामोड..! तब्बल ८२ साक्षीदारांपैकी १३ जणांची साक्ष पूर्ण; पुढे काय उघड होणार?
बुधवार, ३ जून, २०२६
Edit
पुणे : नसरापूर येथे चिमुकलीवर अत्याचार करून तिचा खून
केल्याप्रकरणी येथील न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यात आतापर्यंत एकूण १३
साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली असून, सोमवारी झालेल्या सुनावणीत
मुलीच्या आजीची साक्ष घेण्यात आली.
या प्रकरणात आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे (वय ६५, रा. भोर) याच्याविरोधात राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू आहे.
या खटल्यात एकूण ८२ साक्षीदारांची यादी सरकार पक्षातर्फे सादर करण्यात आली आहे. त्यापैकी पहिल्या १३ साक्षीदारांची साक्ष विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी न्यायालयासमोर नोंदविली. बचाव पक्षातर्फे ॲड. हिंमतराव सूर्यवंशी यांनी साक्षीदारांची उलटतपासणी घेतली. साक्षीदारांमध्ये मुलीची आई, वडील, तिच्या मृत्यूच्या कारणांचा पंचनामा करणारे पंच आणि आरोपीला मुलीसमवेत पाहणाऱ्यांचा समावेश आहे.