निरा–मोरगाव मार्गावर स्कुटीला आयशरची जोरदार धडक; दोन तरुणींचा जागीच अंत
अपघात इतका भीषण होता की स्कुटीचा पूर्णपणे चक्काचूर झाला. आयशर टेम्पो ने स्कुटी गाडीला दीडशे फूट फरपटत नेले यामध्ये कोणीही मुलींचे हात पाय आणि डोक्याला गंभीर इजा झाल्याने या धडकेत स्कुटीवरील दोन तरुणींचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की बघणाऱ्यांचे देखील डोळ्यात अश्रू आले.
अपघातानंतर जखमी झालेल्या एका लहान मुलाला ग्रामस्थांनी तातडीने उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. दरम्यान, अपघात घडल्यानंतर आयशर टेम्पो चालक वाहनासह पळून जाण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र, सतर्क ग्रामस्थांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले व पोलिसांच्या स्वाधीन केले.
मृत तरुणींची ओळख अध्यापक पर्यंत पटलेली नव्हती. त्याच ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून ग्रामस्थांची स्पीड ब्रेकर ची मागणी आहे , गेल्या काही वर्षातचार ते पाच अपघात होऊन या ठिकाणी काही जण जायबंदी झाले आहेत तर काहींना अपंगत्व आला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.