गुन्हे रोखण्यासाठी बारामती पोलिसांची विशेष पेट्रोलिंग मोहीम
गुरुवार, २५ जून, २०२६
Edit
बारामती: बारामती तालुका पोलीस स्टेशन हादीमध्ये कायदा व सुव्यवस्था तसेच
गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्याचे दृष्टिकोनातून पोलीस स्टेशनच्या हद्दीतील
महत्त्वाच्या शाळा कॉलेज बाजारपेठ गर्दीचे ठिकाणी अशा ठिकाणी पोलीस
स्टेशनचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांच्याकडून मोटरसायकल पेट्रोलिंग
करण्यात येते सदरची पेट्रोलिंग ही सकाळ आणि संध्याकाळी करण्यात येत आहे. नागरिकांना आवाहन आहे की कोणत्याही छोट्या मोठ्या कारणावरून वादविवाद करू
नयेत जर कोणी कायदा मोडला तर त्याच्यावर गंभीर स्वरूपाची कारवाई करण्यात
येईल त्याचबरोबर जे रस्त्याने उनाड गिरी टवाळखोर पना करतात त्यांच्यावर कडक
कारवाई करण्यात येणार आहे
त्यामुळे कायद्याचे सर्वांनी पालन करावे अन्यथा कारवाईला सामोरे जावा लागणार आहे.