मुख्यमंत्र्यांच्या परस्पर भेटीवरून सुनील तटकरेंना सुनेत्रा पवारांनी सुनावले; बैठकीत काय घडलं?

मुख्यमंत्र्यांच्या परस्पर भेटीवरून सुनील तटकरेंना सुनेत्रा पवारांनी सुनावले; बैठकीत काय घडलं?

 


मुंबई:  मंगळवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांनी घेतलेली भेट, त्याचवेळी तिथे शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांची उपस्थिती यावरून अजित पवार गटाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना सुनावल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

बुधवारी देवगिरी निवासस्थानी अजित पवार गटाच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीस सुनेत्रा पवार यांच्यासह तटकरे, पार्थ पवार, मंत्री छगन भुजबळ, हसन मुश्रीफ यांच्यासह काही वरिष्ठ नेते उपस्थित होते. जयंत पाटील हे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर कोणताही गैरसमज होऊ नये म्हणून आम्हीही त्या बैठकीला उपस्थित राहिलो असे स्पष्टीकरण तटकरे यांनी बैठकीत दिल्याचे सूत्रांनी सांगितले. तरीही, ही बाब मला आधी सांगणे आवश्यक वाटले नाही का? असा प्रश्न करत सुनेत्रा पवार यांनी तटकरेंना सुनावल्याचे सूत्रांनी सांगितले.

अजितदादा असताना विलीनीकरणाची चर्चा अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचली होती, पण आता पूर्णविराम मिळाला. शरद पवारांच्या पक्षातील नेत्यांनीही विलीनीकरणाच्या चर्चेला पूर्णविराम असल्याचे म्हटले आहे. आता नव्याने ती चर्चा सुरू झालेली नाही, असे तटकरेंनी स्पष्ट केले.