दहावी बारावीच्या गुणवंतांचा ब्राम्हण महासंघातर्फे सत्कार
बारामती: अखिल भार तीय ब्राह्मण महासंघाच्या बारामती शाखेच्या वतीने २१ जून रोजी दहावी-बारावी व विशेष गुणवत्ता प्राप्त विद्या र्थ्यांचा ज्येष्ठ नागरिक संघा च्या सभागृहात सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.संजय पुरंदरे तसेच बारामतीच्या नगरसेविका सौ.अनुप्रिता डांगे हे उपस्थित होते. उदय रानडे व अश्विनी कुमार पत्की यांनी यावेळी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले
संघटनेच्या वतीने पुरस्कार व मार्गदर्शन मिळाले याचा पालकांना व विद्यार्थ्यांना विशेष आनंद झाला.संघाचे तालुका अध्यक्ष जगदीश देशपांडे यांनी आमंत्रितांचे स्वागत केले.महिला अध्यक्षा सौ.मेधा पळशीकर यांनी प्रास्तविक केले आणि युवा शक्तीने संघटनेला जोडून घ्यावे व संघटना वाढवण्या साठी मदत करण्याचे आवा हन केले.यावेळी संघटनेच्या नविन पदनियुक्त्या देण्यात आल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अष्टपुत्रे सर यांनी केले.कार्य क्रम यशस्वी करण्यासाठी किशोरकुमार जोशी,सौ. सारिका इंगळे,सौ.विद्या भोयरेकर,सौ.अश्विनी जोशी केदार सुभेदार,सौ.पल्लवी अभ्यंकर,सौ.योगिता कुलकर्णी तसेच कार्यकारिणी सदस्यांनी योगदान दिले.