पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन
बुधवार, १ जुलै, २०२६
Edit
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष
जालिंदर सोपानराव कामठे (वय ६३, रा. कोंढवा बुद्रुक. पुणे) यांचे आज
बुधवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास निधन झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जालिंदर कामठे हे दररोज मॉर्निंग वॉकला जात होते. परंतु आज अकरा वाजले तरी मॉर्निंग वॉकला गेलेले नव्हते आणि आत मधून दरवाजा बंद होता. त्यामुळे घरातील नातेवाईकांनी त्यांच्या खोलीचा दरवाजा तोडून आत मध्ये प्रवेश केला. तेव्हा जालिंदर कामटे हे बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यांना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले. त्यांच्या निधनामुळे पुणे जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.
दरम्यान, जालिंदर कामठे यांच्या आई हौसाबाई कामठे यांचे मागील तीन महिन्यांपूर्वी निधन झाले होते. कामठे कुटुंब दु:खातून सावरत असतानाच जालिंदर कामठे यांचे अचानक निधन झाल्याने कामठे कुटुंबावर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.