बारामतीच्या शिरपेचात मानाचा तुरा, नीट परीक्षेत श्रावणी कुदळे मुलींच्यात देशात पहिली
श्रावणीला ९९.९९ टक्के
श्रावणीच्या या दैदिप्यमान यशामुळे बारामतीमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शिक्षण क्षेत्रातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे, तिचे आई-वडील दोघेही पुणे जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ज्ञानदान करणाऱ्या शिक्षक दाम्पत्याच्या घरातील मुलीने देशपातळीवर मिळवलेले हे यश शासकीय शिक्षण व्यवस्थेसाठी अभिमानाची बाब मानली जात आहे. श्रावणीने ९९.९९ टक्के मिळवले आहेत. अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या नीट परीक्षेत देशभरातील लाखो विद्यार्थ्यांमधून अव्वल पाचमध्ये स्थान मिळवणे ही मोठी कामगिरी मानली जाते.
श्रावणीच्या जिद्दीला यश
श्रावणीला बायोलॉजीमध्ये पैकीच्या पैकी
वैद्यकीय शिक्षणाच्या माध्यमातून समाजसेवा करण्याचे श्रावणीचे ध्येय असल्याचे तिने सांगितले. तिच्या यशामुळे महाराष्ट्रातील गुणवंत विद्यार्थ्यांची परंपरा पुन्हा एकदा देशासमोर ठळकपणे अधोरेखित झाली आहे. श्रीवणीने ७२० पैकी ७१० मार्क मिळवले आहेत. विशेष म्हणजे तिला बायोलॉजीमध्ये ३६० पैकी ३६० मार्क मिळाले आहेत. तर केमिस्ट्रीमध्ये १८० पैकी १७५ आणि फीजिक्स १८० पैकी १७५ मार्क मिळाले आहेत. श्रावणीला मिळालेल्या या यशानंतर तिचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.