अजित दादा पवार यांच्या पुतळ्याचे गुरुवारी लोकार्पण
बारामती: दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पुतळ्याचे लोकार्पण गुरुवार दि.२३ जुलै २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता उपमुख्यमंत्री मा.श्रीमती सुनेत्रावहिनी पवार यांचे उपस्थितीत होणार आहे.या प्रसंगी खासदार पार्थ पवार,जय पवार व पवार कुंटुंबीय उपस्थित राहणार आहेत.
नटराज नाट्य कला मंडळ या संस्थेच्या वतीने अजिदादांचा १० फूट उंचीचा ब्राँझ धातूचा पुतळा नटराज कलादालनाच्या समोरील जागेत बसविला जात आहे.
बुधवार दि.२२ जुलै रोजी पुतळ्याचे पाद्य पूजन केले जाणार असून गुरुवार दि. २३ जुलै २०२६ रोजी लोकार्पण होणार आहे. तसेच याचवेळी अजितदादा यांच्या छायाचित्रांच्या दालनाचेही लोकार्पण होणार आहे. सर्व धर्मीय प्रार्थना,श्रद्धांजली गीते,भजन होणार आहे.
या प्रसंगी नागरिक बंधू- भगिनीं,कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे,अशी विनंती संस्थेचे अध्यक्ष श्री. किरण गुजर यांनी केले आहे.