युवा नेते युगेंद्र दादांची महावीर पथ व्यापारी असोसिएशनला सदिच्छा भेट

युवा नेते युगेंद्र दादांची महावीर पथ व्यापारी असोसिएशनला सदिच्छा भेट

 

बारामती: बारामती शहरातील महावीर पथ येथील व्यावसायिकांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या व्यवसायातील सद्यस्थितीतीचा आढावा घेतला व त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. बदलत्या काळानुसार व्यापाराचे बदलणारे स्वरूप आणि आजच्या स्पर्धात्मक वातावरणात स्थानिक व्यावसायिकांसमोर असलेली आव्हाने या विषयांवर सविस्तर चर्चा केली.

विशेषतः ऑनलाईन शॉपिंगच्या वाढत्या प्रभावामुळे स्थानिक व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर होणारा परिणाम आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या समस्या समजून घेणे अत्यंत आवश्यक होते. व्यापाऱ्यांचे प्रश्न, त्यांच्या गरजा आणि भविष्यातील व्यापार अधिक गतिमान कसा करता येईल, यावरही आमचा सकारात्मक संवाद झाला.

यावेळी बारामती नगरपरिषदेच्या विरोधी पक्षनेत्या आरतीताई शेंडगे, नगरसेवक यशपाल पोटे, महावीर पथ परिसरातील व्यापारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.