‘मिसिंग लिंक’ कधी सुरू होणार? शिवेंद्रराजे भोसले यांनी केली प्रत्यक्ष पाहणी, दिली मोठी अपडेट

‘मिसिंग लिंक’ कधी सुरू होणार? शिवेंद्रराजे भोसले यांनी केली प्रत्यक्ष पाहणी, दिली मोठी अपडेट

 


मुंबई: मिसिंग लिंक’वर पहाटे ३.३० वाजता दरड कोसळली. ही माहिती मिळताच लगेचच वाहतूक थांबवण्यात आली. आपली सुरक्षा यंत्रणा २४ तास कार्यरत असते, ही वस्तुस्थिती आहे. पाण्याचा असा प्रवाह यापूर्वी कधीही अशा प्रकारे आलेला नाही. मोठा प्रवाह आल्यामुळे पाण्यासोबत माती, दगड वाहून आले. या बोगद्याच्या दर्शनी भागातील रेलिंगवर हा सगळा प्रवाह आला. बोगद्याचा संरचनेला कोणताही धोका नाही, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले स्पष्ट केले आहे. ‘मिसिंग लिंक’वर दरड कोसळल्याची माहिती मिळताच शिवेंद्रराजे भोसले यांनी लगेचच प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पाहणी केली आणि परिस्थितीचा आढावा घेतला.

यानंतर पत्रकारांशी बोलताना शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले की, ‘मिसिंग लिंक’वरील बोगद्याचा दर्शनी भागावर आलेली दरड हटवण्याचे काम सुरू आहे. बराचसा भाग दूर करण्यात आलेला आहे. साधारण अजून दोन ते तीन तास लागतील. हे सर्व काम झाल्यावर वाहतूक कधी सुरू करायची, याचा निर्णय येथील पोलीस घेतील. प्रवाशांची सुरक्षा राहिली पाहिजे. आता सकाळनंतर आतापर्यंत एवढ्या वेळात वरून काही खाली आलेले नाही. पाऊस सुरू आहे, अशी माहिती शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली.

निसर्गाच काय असत आपण सांगू शकत नाही

दुसरे म्हणजे वर जाऊन फार पाहता येत नाही. कारण डोंगरात धुके आहे. पाऊस, धुके आणि वारे तिन्ही गोष्टींमुळे कामात अडथळे येत आहेत. महत्त्वाचे म्हणजे स्ट्रक्चरल डॅमेज झालेले नाही. आपण टेक्नॉलॉजी वापरली आहे. साडेतीन वाजता हे झाल्यावर लगेचच कंट्रोल रूमला समजले. कंट्रोल रूमने अलर्ट दिला आणि लगेच वाहतूक वळवली. आपण टेक्नॉलॉजी वापरली, कॅमेरे बसवलेत. जी काही सिस्टीम सॉफ्टवेअर आहेत, त्यामुळे ताबडतोब माहिती मिळवाली आणि वाहतूक वळवली. शेवटी निसर्ग आहे आणि निसर्गाच काय असत आपण सांगू शकत नाही. सुरक्षितेच्या बाजूने दोन्ही इकडच्या आणि दोन्ही तिकडच्या मार्गिका तपासल्या जातील आणि सुरक्षितता जपली जाईल, असेही ते म्हणाले.

पाहणी करून पुढील उपाययोजना करू

यात काही आता तांत्रिक गोष्टी पाहायला लागतील. परंतु, त्यासाठी पाऊस आणि धुके या गोष्टी कमी व्हायला हव्यात. या बोगद्याच्या वरती जाऊन डोंगरात काही उपाययोजना करणे गरजेचे आहे का, ते पाहावे लागेल. काही ओढे असतील, तर त्याचा प्रवाह वळवावा लागेल. भुसभुशीत माती आहे का, ते पाहावे लागेल. आयआयटीच्या लोकांना बोलावले आहे. पाऊस, धुके कमी झाले की, पाहणी करून पुढील उपाययोजना करू, असेही त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे का, या प्रश्नावर उत्तर देताना शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले की, हा स्लॅब कोसळलेला नाही. हा वरचा बीम आहे. समोरचा बोगदा पाहिला, तर बीमवरून दरड झाली आली आहे. स्लॅबला काही झालेले नाही. दर्शनी भागाच्या बीमवर मोठा पाण्याचा प्रवाह आणि माती दगड आल्यामुळे तो खाली आला आहे. बाकी कुठेही धोका नाही. स्ट्रचरल डॅमेज नाही. पुढेही आम्ही तपासणी करणार आहोत, असे शिवेंद्रराजे भोसले म्हणाले.