नाट्यछटा स्पर्धेत न्यू बालविकास मंदिरच्या सान्वी महाडीक व आद्या थोरात यांचे उल्लेखनीय यश

नाट्यछटा स्पर्धेत न्यू बालविकास मंदिरच्या सान्वी महाडीक व आद्या थोरात यांचे उल्लेखनीय यश

 

बारामती: बालरंगभूमी परिषद,पुणे जिल्हा, उपशाखा पिंपरी-चिंचवड आयोजित कै.सौ.मनिषा भाऊसाहेब भोईर स्मृती नाट्यछटा स्पर्धेत न्यू बालविकास मंदिर,पिंपळी येथील विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन केले.इयत्ता आठवीतील सान्वी अमरेंद्र महाडीक हिने द्वितीय क्रमांक मिळवला, तर याच शाळेतील इयत्ता नववीतील आद्या अजय थोरात हिला उत्कृष्ठ सादरीकरणाबद्दल सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

     सान्वीने स्पर्धेसाठी ‘'माझा डाएट उद्यापासून सुरू!’' हा विषय निवडला होता. विशेष म्हणजे या नाट्यछटेचे लेखन तिने स्वतः केले होते. स्वतः लिहिलेल्या नाट्यछटेचे प्रभावी सादरीकरण करून तिने अभिनयासोबतच आपली लेखनक्षमता, कल्पकता आणि सर्जनशीलतेचीही झलक दाखवून दिली.

     सान्वीच्या तयारीसाठी ज्योती दिसले मिस व अर्चना देव मिस यांचे मार्गदर्शन लाभले.तसेच तिची आई प्रिया महाडीक यांनीही तिची विशेष तयारी करून घेतली.सान्वीच्या या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका तनुश्री गोरे मॅडम यांनी तिचे विशेष कौतुक केले.तसेच विभागप्रमुख लीला शेट्टी मिस यांनीही तिच्या यशाचे अभिनंदन केले.

    याच स्पर्धेत आद्या अजय थोरात हिनेही उत्कृष्ठ सादरीकरण करत विशेष पारितोषिक मिळवले.तिच्या प्रभावी अभिनयाची दखल घेत तिला सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

    या दोन्ही विद्यार्थिनींची पुढील फेरीसाठी निवड झाली असून, बुधवार दि. २६ ऑगस्ट रोजी पुणे येथे पुढील फेरी पार पडणार आहे.या फेरीत सान्वी अमरेंद्र महाडीक आणि आद्या अजय थोरात या दोघीही आपल्या कलागुणांचे सादरीकरण करणार आहेत.

     एकाच शाळेतील दोन विद्यार्थिनींची पुढील फेरीसाठी निवड होणे ही न्यू बालविकास मंदिर,पिंपळी शाळेसाठी अभिमानाची बाब ठरली आहे.या दोन्ही विद्यार्थिनींच्या यशामुळे शाळेचे नाव उंचावले असून, त्यांच्या यशाबद्दल पालक, विद्यार्थी,शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी वर्गातून कौतुक व्यक्त होत आहे. दोन्ही विद्यार्थिनींना पुणे येथे होणाऱ्या पुढील फेरीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.