अल्पवयीन मुलीच्या संशयास्पद मृत्यूने बारामती परिसरात खळबळ; आत्महत्या ? हत्या? नेमका प्रकार काय ? पोलिसांकडून तपास सुरू

अल्पवयीन मुलीच्या संशयास्पद मृत्यूने बारामती परिसरात खळबळ; आत्महत्या ? हत्या? नेमका प्रकार काय ? पोलिसांकडून तपास सुरू

 

बारामती: आई रागावल्याने घरातून निघून गेलेल्या अल्पवयीन अवनी अजित दशावतारे या १४ वर्षाच्या मुलीचा मृतदेह रुई हद्दीतील स्वामी समर्थ रेसिडेन्सी इमारतीजवळ आढळून आल्याने परिसरात,तालु क्यात खळबळ उडाली आहे.

     प्राथमिक तपासात सदर मुलीने-अवनीने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील टेरेस वरून उडी मारून आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होत असल्याची माहिती बारामती तालुका पोलिसांनी दिली आहे.या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,शनिवार दि. २२ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे साडेनऊ,पावणेदहा वाजण्याच्या सुमारास मुलीला आईवडील  रागावले.त्यानंतर ती रागाच्या भरात घरातून निघून गेली. 

      कुटुंबीयांनी तिचा आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला ; मात्र ती मिळून न आल्याने रविवार दि.२३ ऑगस्ट रोजी पहाटे सुमारे ३ वा.४०मिनिटानी तिचे आई-वडील व कांही नाते वाईक बारामती तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाले.नाईट राउंड अधिकारी पो.हेकॉ.बापू कांबळे यांनी मुलीच्या वडिलांसोबत परिसरात शोध घेतला.मात्र मुलगी सापडली नाही. त्या नंतर मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ४०१/२०२६, कलम १३७(२) बीएनएस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

      गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांकडून सदर मुलगी अवनीचा शोध सुरू असतानाच डायल ११२ चे पोहेकॉ. कृष्णा कांबळे यांना रुई हद्दीतील स्वामी समर्थ बिल्डिंगच्या बाजूला एक मुलगी मयत अवस्थेत पडल्याची माहिती मिळाली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत नातेवाईकांना बोलावून मृतदेहाची ओळख खातरजमा केली असता, तीच हरवलेली अल्पवयीन मुलगी असल्याचे निष्पन्न झाले.

      घटनेची माहिती मिळ ताच महिला पोलीस उप निरीक्षक धनश्री भगत, उप विभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम आणि पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन स्थितीची पाहणी केली. तपासासाठी फॉरेन्सिक टीम तसेच डिटेक्शन ब्रँचच्या तीन पथकांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी स्वामी समर्थ रेसिडेन्सीच्या पाचव्या मजल्यावरील टेरेसची पाहणी केली असता टेरेसचा दरवाजा बाहेरून बंद असल्याचे आढळून आले.त्यानंतर स्थानिक मुलांच्या मदतीने शिडीच्या सहाय्याने पोलिसांनी टेरेसवर प्रवेश केला.तेथे मयत मुलीची चप्पल आढळून आली. तसेच इमारतीच्या लिफ्ट जवळील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता,सदर मुलगी रात्री ९वाजून ५८मिनिटे वाजण्याच्या सुमारास लिफ्टने वर गेल्याचे दिसून आले.

   मुलीच्या शरीरावर तोंडावर खरचटल्याच्या जखमा आढळल्या असून, डावा हात व डावा पाय फ्रॅक्चर झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक पाहणीत दिसून आले.ती पालथ्या अवस्थेत पडलेली होती.घटनास्थळावरील परिस्थिती, सीसीटीव्ही फुटेज आणि उपलब्ध परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे मुलीने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. 

    मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी शवविच्छेदन अहवाल महत्त्वाचा ठरणार आहे. मयत मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी वैद्यकीय महाविद्यालय,बारामती येथे पाठविण्यात आला आहे. शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे.

मात्र मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी शवविच्छेदन अहवाल महत्त्वाचा ठरणार आहे. मयत मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी वैद्यकीय महाविद्यालय, बारामती येथे पाठविण्यात आला आहे. शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे.

       या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम व पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शना खाली महिला पोलीस उपनिरीक्षक धनश्री भगत करीत आहेत.