एकनाथ शिंदे यांची पंतप्रधान मोदींशी तासभर चर्चा; काय ठरले? तर्कवितर्कांना उधाण
सोमवार, १० ऑगस्ट, २०२६
Edit
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार व शिवसेनेच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणीला सुरवात झाली असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. एकाच महिन्यात शिंदे यांचा हा दुसरा दिल्ली दौरा होता.
पंतप्रधान कार्यालयात एक तास चाललेल्या या बैठकीत काय ठरले, याबद्दल राज्यात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
मोदींकडून सहकार्याचे आश्वासन मिळाले - एकनाथ शिंदे
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील अतिवृष्टी आणि पूरस्थितीची माहिती शिंदे यांनी पंतप्रधानांना दिली. बाधित भागांतील पुनर्वसन आणि मदतकार्यांसाठी केंद्र सरकारकडून आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, असे आश्वासन पंतप्रधानांनी दिल्याची माहिती देण्यात आली.
शिंदेसेनेच्या खासदारांसाठी आयोजित न्याहारी बैठकीत पंतप्रधानांनी मतदारसंघांतील विकासकामांना गती देण्यावर भर दिला. केंद्र किंवा प्रशासकीय स्तरावर अडथळे आल्यास थेट पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क साधावा, असे निर्देश त्यांनी दिल्याचे सांगण्यात आले. दिल्ली दौऱ्यादरम्यान शिंदे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचीही भेट घेतली.