"पण त्याची कधी बातमी छापली जात नाही", नितीन गडकरींनी व्यक्त केली खंत, 'मिसिंग लिंक'चाही उल्लेख
पण दुसरा राज्य सरकारचा कुठलाही रस्ता असला आणि त्यावर खड्डे असले तर त्याचा संबंध लोक माझ्याशीच जोडतात,” अशी खंत नितीन गडकरी यांनी बोलून दाखवली.
एका कार्यक्रमात गडकरी यांनी ‘मिसिंग लिंक’वरही भाष्य केले आहे. ते म्हणाले की, “माझ्या कार्यकाळात वन खात्याकडून मिसिंग लिंकसाठी परवानगी मिळाली नाही, त्यामुळे मी हा रस्ता बनवू शकलो नव्हतो. पण आता महाराष्ट्र सरकारनं मिसिंग लिंक बनवला आणि तो खराब झाला. पण तरीही सोशल मीडियावर मला टार्गेट केलं गेलं.
खरंतर तो प्रकल्प महाराष्ट्र सरकारचा आहे. त्यांनी अमंलबजावणी केली आहे. राज्य सरकारने बांधलेल्या रस्त्यांसंदर्भात काही समस्या असली तरी मलाच जबाबदार धरले जाते, पण आता सोशल मीडियाचा एक फायदा झाला आहे, तो म्हणजे क्वालिटी कन्ट्रोलसाठी तो खूपच उपयोगी बनला आहे. आता लगेच लक्षात येतं कुठे गडबड झाली आहे.” Nitin Gadkari
पण या रस्त्यावरील दोन क्रमांकाच्या बोगद्याच्या इथे ६ जुलै २०२६ रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळं दरड कोसळली. त्यामुळे १८ तास हा मार्ग बंद ठेवून यावरची वाहतूक जुन्या मार्गावरुन वळवण्यात आली होती. या दुर्घटनेमुळे मिसिंग लिंक रस्त्याच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. दरम्यान, हा रस्ता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं (MSRDC) हा रस्ता तयार केला.