१२ सप्टेंबरपर्यंत टप्प्याटप्प्याने मुंबईत पोहोचा; पण आझाद मैदानाकडे जाऊ नका- मनोज जरांगे
वडीगोद्री (जि.जालना) : सरकारकडून अद्याप ठोस निर्णय झालेला नसल्याने मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना मुंबईकडे टप्प्याटप्प्याने कूच करण्याचे आवाहन केले आहे. १२ सप्टेंबरपर्यंत मुंबईत पोहोचा; मात्र आझाद मैदानावर जाऊ नका, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.
‘चर्चेसाठी अंतरवाली सराटीतच या’
मराठा आरक्षणाबाबतच्या प्रलंबित मागण्यांसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील आंदोलन सुरू असून त्यांच्या उपोषणाचा सोमवारी तिसरा दिवस होता. सरकारशी चर्चेचे दरवाजे खुले असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. जरांगे पाटील यांच्या रक्तातील साखरेच्या रिपोर्टवरून काही काळ संभ्रम निर्माण झाला. उपोषणाच्या पहिल्या दिवशी रक्तातील साखर ९४ होती. त्यानंतर ती ६६ पर्यंत खाली आली. मात्र, सोमवारी ७२ वरून पुन्हा ८० पर्यंत वाढल्याचे सांगण्यात आल्यानंतर जरांगे पाटील संतप्त झाले.