१६ सप्टेंबर रोजी ४४ वाहनांचा बारामतीत ई-लिलाव

१६ सप्टेंबर रोजी ४४ वाहनांचा बारामतीत ई-लिलाव

 

बारामती :- मोटार वाहन कर न भरल्यामुळे तसेच मोटार वाहन कायदा व त्याअंतर्गत नियमांतील विविध तरतुदींचे उल्लंघन केल्यामुळे अटकावून ठेवलेल्या वाहन मालकांनी ७ दिवसांच्या आत ताबा न घेतल्यास १६ सप्टेंबर २०२६ रोजी ई लिलाव करण्यात येईल, असे उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने कळविले आहे.

     वाहनांच्या मूळ मालकांना वाहन कर, दंड व इतर देय रक्कम भरण्याबाबत यापूर्वी तीन नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. तथापि, संबंधित वाहनमालकांकडून अद्याप देय रकमेचा भरणा करण्यात आलेला नाही व वाहनांचा ताबाही घेण्यात आलेला नाही.

       या ४४ वाहनांची यादी कार्यालयाचे सूचना फलका वर प्रसिद्ध करण्यात आली आहे.संबंधित वाहन मालकांनी,ताबेदारांनी कार्यालयीन प्रकरणांची पूर्तता करून,थकीत कर, दंड व इतर देय रक्कम भरून विहित कालावधीत संबंधित वाहनांचा ताबा न घेतल्यास, कोणतीही पुढील सूचना न देता सदर वाहनांचा भंगार (Scrap) स्वरूपात जाहीर ई-लिलाव उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, बारामती यांच्यामार्फत www.mstcecommerce.com च्या संकेतस्थळावर करण्यात येईल याची संबंधित वाहनमालक, ताबेदार यांनी नोंद घ्यावी, असेही कळविण्यात आले आहे.