माझे कान, माझा अधिकार..; पुण्यात डीजेविरोधात एल्गार
'माझे कान, माझा अधिकार, ध्वनी प्रदूषणाला नकार' आणि 'डीजे बंदी झालीच पाहिजे' अशा जोरदार घोषणा नागरिक देत होते. सोलापूर, नागपूरसारख्या शहरात बंदी होऊ शकते, मग पुण्यामध्येच मोकळे रान का दिले जात आहे? असा संतप्त सवाल यावेळी नागरिकांनी प्रशासनाला विचारला. प्रशासनाने आखून दिलेली 'चार टॉप, चार बेस' ही प्रणाली ध्वनीची पातळी ६५ डेसिबलच्या मर्यादेत ठेवते, असा दावा कसा केला जाऊ शकतो, असा प्रश्न मंचाने उपस्थित केला आहे. आंदोलकांनी विद्यानंद बापट यांच्या समर्थनाचे फलक धरले होते. बापट मात्र या मोर्चाला अनुपस्थित होते.
नागरिकांच्या प्रमुख मागण्या
डॉल्बीमुळे ॲटॅक येऊ शकतो
सण पारंपरिक पद्धतीने साजरे करण्यासाठी नियमावली असावी, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी ठाण्यात केली. डॉल्बीमुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो, तर लेझर व मोठ्या आवाजामुळे डोळे-कानांना नुकसान होऊ शकते, असे ते म्हणाले.
आवाजावरून मतभेद
हिंदू सणांमधील आवाज बंद केला जाणार नाही. हा सरकारचा पवित्रा आहे- योगेश कदम, गृहराज्यमंत्री
छत्रपती संभाजीनगरात डीजे व्यवस्था नको. पोलिस कायद्यानुसार कठोर कारवाई करतील. नियम तोडणाऱ्यांना दंड केला जाईल- संजय शिरसाट, पालकमंत्री, छत्रपती संभाजीनगर
डीजेमुळे माझा भाऊ गेला
दुर्दैवाने डीजेच्या आवाजामुळे गेल्या वर्षी माझ्या चुलत भावाचा मृत्यू झाला. आम्ही वारंवार लोकांना आवाहन करतो. मात्र, अनेकांकडून त्याचे पालन होत नाही
- मेघना बोर्डीकर, आरोग्य राज्यमंत्री