२५ सप्टेंबरपर्यंत यलो अलर्ट; ‘या’ जिल्ह्यांत पडणार मुसळधार पाऊस, जाता जाता मान्सून सक्रीय!
विदर्भ, मराठवाड्यातील बहुतांश, तर मध्य महाराष्ट्रातील काही भागात पावसाची मोठी तूट निर्माण झाली आहे. आता बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील काही भागात पुढील २ दिवस वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे काही भागांना मागील काही दिवसांच्या तुलनेत दिलासा मिळेल, असे सांगितले जात आहे.
२५ सप्टेंबरपर्यंत ‘या’ जिल्ह्यांत पडणार मुसळधार पाऊस
- २३ सप्टेंबर रोजी नाशिक, कोल्हापूर घाट, अकोला, नाशिक घाट, सांगली, हिंगोली, अहिल्यानगर, सोलापूर, अमरावती, रायगड, बीड, यवतमाळ, पुणे घाट, धाराशिव, चंद्रपूर, पुणे, लातूर, वर्धा, सातारा, नांदेड, नागपूर, सातारा घाट, जालना, गोंदिया, रत्नागिरी, परभणी, भंडारा, सिंधुदुर्ग, वाशिम, गडचिरोली, कोल्हापूर, बुलढाणा या भागांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
- २४ सप्टेंबर रोजी सातारा, सातारा घाट, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, कोल्हापूर घाट, लातूर, नांदेड, जालना, परभणी, वाशिम, बुलढाणा, अकोला, हिंगोली, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली या भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
- २५ सप्टेंबर रोजी वाशिम, चंद्रपूर, बुलढाणा, वर्धा, अकोला, नागपूर, हिंगोली, गोंदिया, अमरावती, भंडारा, यवतमाळ, गडचिरोली या भागांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
दरम्यान, यलो अलर्टच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होत असताना आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असून १५ ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण देशातून मान्सून माघारी जाईल. राज्यातून मान्सून माघारी फिरण्याची सरासरी तारीख १० ऑक्टोबर आहे, असे म्हटले जात आहे.