एकरी १०० टनांहून अधिक ऊस उत्पादन; माळेगाव कारखान्यात शेतकऱ्यांचा गौरव

एकरी १०० टनांहून अधिक ऊस उत्पादन; माळेगाव कारखान्यात शेतकऱ्यांचा गौरव

 

शरद कृषी ऊस समृद्धी योजनेतील पाच विजेत्यांसह विक्रमी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान

​ बारामती : दि माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शरद कृषी ऊस समृद्धी योजनेअंतर्गत पाच शेतकऱ्यांसह एकरी १०० टनांपेक्षा जास्त ऊस उत्पादन घेणाऱ्या १९ सभासद शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. कारखान्याच्या अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते शेतकऱ्यांना स्मृतीचिन्ह व रोख २५ हजार रुपयांचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

 दि ​माळेगाव सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.शरद कृषी समृद्धी योजनेतून जादा ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष नितीनकुमार शेंडे,कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे,संचालक मंडळाचे सदस्य व सभासद उपस्थित होते.

       ​शरद ऊस समृद्धी योजनेतील विजेते शशिकांत शिवनारायण सुपेकर,तेजस संजय जगताप,प्रदीप विश्वनाथ जगताप,माधव बाबासाहेब बनकर आणि मंगेश गणपत सोलनकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

​तंत्रज्ञानाचा वापर-उत्पादनात वाढ     

   "माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक उत्पादन घेण्यात नेहमीच आघाडीवर राहतो,याचा आम्हां सर्वांना सार्थ अभिमान आहे," असे उपाध्यक्ष नितीनकुमार शेंडे यांनी सांगितले.

​पुढील शेतकऱ्यांनी गाठला एकरी १०० टनांचा टप्पा

  ​भुजंगराव मारुतराव टेंगले, गोरख मुगुटराव तावरे,अभिषेक गोरख तावरे,अशोक निवृत्ती तावरे,निलेश भुजंग टेंगले,कृष्णराव भिवा टेंगले,नलिनी यशवंत जगताप,सूर्यकांत रघुनाथ बनकर,पिकेश सुरेश जमदाडे,शशांक सुरेश जमदाडे,धीरज आप्पा कोकरे,अरविंद बाबुराव निंबाळकर, मनोहर शिवाजी जगताप, जैनुद्दीन साहेबलाल मुजावर, देवीदास शंकर गुरव, अरविंद रामचंद्र जगताप, सोनाबाई बाळासाहेब कोकरे,नंदकुमार काशिनाथ जगताप आणि वर्षा नितीन जगताप यांचा यावेळी गौरव करण्यात आला.

​"शेतकऱ्यांनी अधिकाधिक ऊस उत्पादन घेऊन माळेगाव साखर कारखान्याच्या नावलौकिकात वाढ केली आहे."