पुरुषोत्तम जगताप यांच्या अडचणीत वाढ; सोमेश्वरच्या आखाड्यात अजितदादा पॅनलच्या नावावरून वाद चर्चेत ; कारवाईचा इशारा
बारामती : श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत शेवटच्या क्षणी चकवा देत बंडखोरी करणारे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाच्या रडारवर आले आहेत
सोमेश्वरच्या शिवारात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावावरून राजकीय संघर्ष उफाळून आला आहे
जगताप यांच्या पॅनलकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा व्हिडिओ मॉर्फ करून प्रचारासाठी वापरल्याचा, तसेच दिवंगत अजित पवार यांच्या आवाजाचा आणि एआय तंत्रज्ञानाचा वापर करून व्हिडिओ तयार केल्याचा आरोप केला आहे
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आवाजाचा वापर करून तयार करण्यात आलेल्या व्हिडिओप्रकरणीही कारवाई केली जाणार असल्याने निवडणुकीचे शिवार चांगलेच तापले आहे
जगतापविरोधात अद्याप नाराजी
सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांना १३ वर्षे अध्यक्षपदाची संधी दिली आहे
. तरीही त्यांना पुन्हा अध्यक्षपद हवे आहे काय, असा टीकात्मक सूर सभासदांमधून उमटत आहे . जगताप यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटपर्यंत गाफील ठेवले, अशी प्रतिक्रिया सर्वच सभासदांमधून उमटली आहे . ज्यांना पद देऊन मोठे केले, त्यांनीच दगाफटका केल्याची भावना सभासदांमधून उमटली आहे .