एसटी प्रवासाची प्रस्तावित १५ टक्के भाडेवाढ रद्द

एसटी प्रवासाची प्रस्तावित १५ टक्के भाडेवाढ रद्द

 

मुंबई : ऐन दिवाळी च्या हंगामात एसटी महामंडळाच्या प्रवासी भाड्यात १५ टक्के हंगामी भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी नामंजूर केला आहे.त्यामुळे १ ते १५ नोव्हेंबर दरम्यानची प्रस्तावित भाडेवाढ लागू होणार नाही. 

     एसटीला तोटा सहन करावा लागत असला, तरी त्याची भरपाई प्रवाशांकडून करणे योग्य नाही,असे त्यांनी स्पष्ट केले.  

प्रवाशांना एसटीचा दिलासा

   ​दरवर्षी दिवाळी सणाच्या गर्दीच्या काळात एसटीच्या प्रवासी भाड्यात हंगामी वाढ केली जाते.मात्र, दुष्काळ आणि महागाई मुळे जनता संत्रस्त आहे. आधीच अडचणीत असलेल्या नागरिकांना आणखी आर्थिक झळ सोसावी लागू नये,या साठी मंत्री सरनाईक यांनी हा प्रस्ताव फेटाळला.ग्रामीण भागा तील नागरिक,शेतकरी, शेतमजूर,विद्यार्थी-विद्यार्थिनी,कष्टकरी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचे साठी एसटी ही प्रवासाचे महत्त्वाचे साधन बनले आहे.