रेशनवर यंदा दिवाळी साठी धान्य,साखर नाही; धान्य वाटप नियमितच

रेशनवर यंदा दिवाळी साठी धान्य,साखर नाही; धान्य वाटप नियमितच

 

पुणे : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी रेशनकार्ड धारकांना नियमित धान्य मिळणार आहे,त्यामुळे दिवाळीसाठी स्वस्त धान्य(रेशन) दुकानां मधून अतिरिक्त धान्य, खाद्यतेल,साखर आदी मिळण्याची अपेक्षा असलेल्या लाभार्थ्यांना नियमित धान्य वाटपा वरच अवलंबून राहावे लागणार आहे.    

     दिवाळीसाठी स्वतंत्र धान्य कोटा मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष धान्य कोटा मंजूर केला नसल्याने लाभार्थ्यांना दरमहा प्रमाणे मिळणारे, नियमितपणे वितरित होणारे धान्यच मिळेल, अशी माहिती अन्नधान्य वितरण व पुरवठा अधिकारी यांनी दिली आहे.