सोमेश्वरच्या शिवारात पुरुषोत्तम जगतापांच्या पुढेचं आव्हान; राष्ट्रवादीची बंडखोरांना रोखण्यासाठी रणनिती
बारामती : राज्यात सर्वाधिक ऊसदर देणा ऱ्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक चुरशीची होत आहे.अजित पवारांनी संधी दिल्याने १२ वर्षां पासून अध्यक्षपदाची एकहाती सूत्रे हाती असलेले विश्वासू शिलेदार पुरुषोत्तम जगताप यांनी बंडाचे निशाण फडकावत प्रस्थापित राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या पॅनलला आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे.मात्र, ही लढाई सहज सोपी नसून जगताप यांच्यापुढे मोठीच आव्हाने आहेत. अजित पवार गट आणि शरद पवार गटाकडून सुध्दां जगताप हे टीकेच्या रडारवर आहेत. त्यासाठी अजित पवार गटाने रणनिती आखली आहे. तिरंगी लढतीत सुज्ञ सभासद जुन्या पायवाटेवरून जाणार की परिवर्तनाला साथ देणार ? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.कारण अजितदादा बारामती हेच कुटुंब मानत आणि लहानथोर सर्वांच्या मदतीला दादा,सुनेत्रावहिनी धावून जात.त्यामुळे सोमेश्वरचे सभासद,मतदार सुध्दां
सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत मतदार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार खा.पार्थ पवार व जयदादा पवार कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत.
उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी नाट्यमय आणि धक्कादायक घडामोडी झाल्या.विद्यमान अध्यक्ष जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून जाहीर झालेली उमेदवारी नाकारत भाजपसोबत स्वतंत्र पॅनल तयार करत सोयरीक जुळवली. शेवटच्या क्षणी हा राजकीय पट उलगडला तरी यामागे सहा महिन्यां पूर्वीची रणनिती असल्याची चर्चा आहे. जगताप यांनी बंड केल्याने सभासदांना आश्चर्याचा धक्का बसला.राष्ट्रवादीने शिवसेना (शिंदे गट) ला एक जागा देत सोबत घेतले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षही निवडणूक लढवत आहे.
अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी भाजपच्या सहकार्याने स्वतंत्र पॅनल केले.यावेळी जगताप यांच्याबरोबर पुरंदरचे भाजपचे माजी आमदार संजय जगताप,राष्ट्रवादी चे सुदाम इंगळे, शरद पवार गटाचे नेते माणिक राव झेंडे,कार्यक्षेत्रातील संचालक आहेत.जगताप यांनी राष्ट्रवादीविरोधात आव्हान उभे केले तरी संपूर्ण ताकद पणाला लावावी लागणार आहे. जगताप यांच्यासाठी राजकीय अस्तित्वाचा प्रश्न आहे.मात्र अजित दादा वत्यांचे कुटुंब कसलाच भेदभाव न करतां अल्पभूधारक शेतकऱ्यांनाही दरमहा ५ किलो साखर देणे, सभासदांची शिक्षण, आरोग्य,नोकरी बरोबर विविध कामे करणे यामुळे बहुसंख्य मतदार पवार कुटुंब,राष्ट्रवादीच्या बाजुने ठाम असल्याचे दिसते.
◾ मुरूम- वाल्हा गटात हायव्होल्टेज लढती
मुरूम-वाल्हा गटात तिरंगी लढती होत आहेत.बंडखोर नेते पुरुषोत्तम जगताप (वाणेवाडी),सतीश सकुंडे (वाघळवाडी), वैभव गायकवाड (करंजेपूल) हे नशीब आजमावत आहेत. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून विक्रम भोसले (वाणेवाडी),ऋषिकेश गायकवाड (करंजेपूल), राजवर्धन शिंदे (मुरूम), तर शरद पवार गटाच्या पॅनलकडून राजेंद्रकुमार जगताप (वाणेवाडी), प्रवीणभोसले(वाणेवाडी) संदीप चव्हाण (मुरूम) यांच्यात तिरंगी हायव्होल्टेज लढती होत आहेत.
◾ जगतापांच्या बंडखोरीचे शल्य
सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष,अजित पवार यांचे विश्वासु पुरुषोत्तम जगताप यांनी बंडखोरी करत स्वतंत्र पॅनल उभे केले.याबाबत राष्ट्रवादीचे नेते जय पवार यांनी नाराजी व्यक्त केली.तर युगेंद्र पवार यांनी टोला लगावला आहे.त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी गटांकडून जगताप हे टार्गेटवर आहेत. त्यातच जगताप यांच्या बंडामुळे सभासदांना तर जास्तचं शल्य आहे.सलग बारा वर्षे देऊनही आणखी काय,किती दिले पाहिजे ? हे शल्य आणि बराचसां सुप्त राग मतपेटीतून उमटणार काय याकडे दोन जिल्ह्यांचे लक्ष लागले आहे.
◾ अजितदादांच्या निधनाची सहानुभूती
सोमेश्वर कारखान्यावर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे एकहाती वर्चस्व होते. विद्यमान अध्यक्ष जगताप यांना जास्त संधी दिली.एक दशकां हून अधिक काळ ते पदावर होते. अध्यक्षपद उपभोगूनही जगताप यांनी वेगळी चूल मांडली,हे बहुसंख्य सभासद,मतदारांना आवडलेले,रुचले नाही. त्यातच अजितदादांच्या निधनानंतर ही पहिलीच निवडणूक होत आहे. त्यामुळे सभासदांची सहानुभूती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना मिळणार,असा सूर कार्यक्षेत्रात दिसून येत आहे.
◾ मतविभाजन पवारांच्या पथ्यावर?
सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत तिरंगी लढती होत आहेत. त्यात एकसंघ राष्ट्रवादी अजित पवार गटात फूट पडून १२ वर्षे अध्यक्षपदी राहिलेल्या पुरुषोत्तम जगतापांनी बंडखोरी करून पॅनेल उभा केल्याने मतांची विभागणी होणार आहेच.पण अजितदादा पवार व शरद पवार गट एकला चलो रेच्या भूमिकेतून मैदानात उतरला आहे. बारामती, पुरंदर,खंडाळा कार्यक्षेत्र असलेल्या सोमेश्वरच्या आखाड्यात सुज्ञ सभासद अजितदादा आणि त्यांच्या कार्याला विसरू नाहीत.त्यामुळे सुनेत्रा पवार कुटुंबाच्या बाजूने झुकणार असे दिसत असुन चर्चाही तशीच ऐकू येत आहेत. मतविभाजन कोणाच्या पथ्यावर पडणार हे सुज्ञास अधिक सांगण्याची गरज नाही.