गुजर बालविकास मंदिरला ‘मृदगंध करंडक’
‘दादांनी घडवले ली बारामती’नाटिकेला प्रथम क्रमांक ; २८ शाळांचा सहभाग
बारामती : एन्व्हॉर्यर्मेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने आयोजित मृदगंध २०२६ सांस्कृतिक स्पर्धेत विद्या प्रतिष्ठान विनोदकुमार गुजर बालविकास मंदिर शाळेने सादर केलेल्या ‘दादांनी घडवलेली बारामती’ या नाटिकेने प्रथम क्रमांकाचा मृदगंध करंडक पटकाविला. बारामती पंचक्रोशीतील २८ शाळांनी स्पर्धेत सहभाग घेतला. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीच्या विकासासाठी दिलेले योगदान या विषयावर विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले.
शनिवार (दि.३) व रविवार (दि.४) असे दोन दिवस गदिमा सभागृहात स्पर्धा पार पडली. विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी फोरमच्या अध्यक्षा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या संकल्पनेतून मृदगंध विविध गुणदर्शन स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जाते.
पिंपळी येथील विद्या प्रतिष्ठान न्यू बाल विकास मंदिर शाळेला द्वितीय,तर काऱ्हाटी येथील के.यू.एम.एस. एस.गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलला तृतीय क्रमांक मिळाला.परीक्ष क तन्मय जक्का व हर्षदा अभ्यंकर यांच्या हस्ते विजेत्यांना पारितो षिके प्रदान करण्यात आली. इंदापूरच्या विद्या प्रतिष्ठान इंग्लिशमीडियम स्कूलला उत्तेजनार्थ प्रथम,तर अनेकान्त इंग्लिश मीडियम शाळेला उत्तेजनार्थ द्वितीयक्रमांक मिळाला.
◼️अन्य पारितोषिके :> उत्कृष्ठ अभिनय स्त्री : यशोधरा खरात (आर.एन.अगर वाल टेक्निकल हायस्कू ल) आराध्या जाधव (सोमेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल), अनुष्का चांदगुडे (गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल). प्रमाणपत्र : प्रगती सस्ते (गुरुकुल कान्हाटी), राजेश्वरी भिरंगी (वि. प्र. इंग्लिश मीडियम स्कूल सी. बी. एस. ई.).
उत्कृष्ट पुरुष : आयुष बंडगर (वि. प्र. विनोदकुमार गुजर बाल विकास मंदिर), वरद खारतोडे (वि. प्र. मराठी माध्यमिक शाळा), रजत पाटील (वि. प्र. विनोदकुमार गुजर बाल विकास मंदिर). प्रमाणपत्र : सतीश पाटील (इंदापूर इंग्लिश मीडियम), राज सोनवणे (अनंतराव पवार स्कूल).
◼️उत्कृष्ठ नेपथ्य :> स्नेहल कदम व विशाल बारवकर (अनेकान्त शाळा), सचिन कुंभार व वृषाली साबळे (बाल विकास मंदिर पिंपळी), प्राजक्ता घुमटकर व पूनम खोमणे (झैनेडिया स्कूल).
◼️उत्कृष्ठ लेखन :> विनायक अष्टपुत्रे (विनोदकुमार गुजर बाल विकास मंदिर), फरिदा नबाब (न्यू बाल विकास मंदिर, पिंपळी), रेखा वाघमारे व चेतन सातार कर (वि.प्र.इंदापूरशाळा)
◼️उत्कृष्ठ दिग्दर्शन :> ज्योती जोशी व सुवर्णा पोवार (विनोदकुमार गुजर बाल विकास मंदिर), फरिदा नबाब व अर्चना राजोपाध्ये (वि.प्र.न्यू बाल विकास मंदिर), सुप्रिया लोणकर, कोमल चांदगुडे व प्रीती लोंढे (गुरुकुल स्कूल, काऱ्हाटी)ज्ञानेश्वर जगताप व अमर महाडीक यांनी सूत्रसंचालन केले.