बारामतीकरांची पाण्याची चिंता मिटली! आता शहराला दररोज मुबलक पाणीपुरवठा
कालव्याचे पुढील नियोजित आवर्तन १० नोव्हेंबर २०२६ रोजी सुरू होणार होते. मात्र, दिवाळीच्या सणात नागरिकांची पाण्यासाठी कोणतीही गैरसोय होऊ नये आणि प्रत्येक कुटुंबाला सण आनंदात साजरा करता यावा, यासाठी बारामती नगरपरिषदेने तातडीने पाठपुरावा केला.
नगराध्यक्ष सचिन सातव, पाणीपुरवठा सभापती मनीषा चव्हाण आणि मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रावहिनी अजितदादा पवार, खासदार पार्थदादा पवार आणि युवा नेते जयदादा पवार यांच्याकडे विशेष विनंती करून निरा डाव्या कालव्याचे आवर्तन नियोजित वेळेपूर्वी सुरू करण्यासाठी तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली.
बारामतीकरांच्या या मागणीची तातडीने दखल घेत उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार, खासदार पार्थदादा पवार आणि युवा नेते जयदादा पवार यांनी संबंधित विभागाला त्वरित निर्देश दिले. त्यामुळे १० नोव्हेंबरची वाट न पाहता निरा डाव्या कालव्याचे आवर्तन सुरू करण्यात आले आहे.
बारामती शहराच्या विकासासोबतच शहरातील प्रत्येक नागरिकाच्या दैनंदिन गरजांकडे उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांचे कायम विशेष लक्ष असते. शहरातील कोणताही प्रश्न असो, नागरिकांच्या अडचणींची माहिती मिळताच त्या तत्परतेने दखल घेऊन संबंधित यंत्रणेला आवश्यक सूचना देतात. यावेळीही दिवाळीच्या काळात पाण्याची गैरसोय होऊ नये, यासाठी त्यांनी दाखवलेली तत्परता बारामतीकरांसाठी दिलासादायक ठरली आहे.
या निर्णयामुळे आता दिवाळीच्या सणात बारामती शहरातील नागरिकांना दररोज आणि मुबलक पाणीपुरवठा करणे शक्य होणार असून, पाण्याअभावी होणारी गैरसोय दूर होण्यास मोठा दिलासा मिळणार आहे.
नागरिकांची गरज ओळखून नगरपरिषदेने केलेला तातडीचा पाठपुरावा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार, खासदार पार्थदादा पवार व युवा नेते जयदादा पवार यांनी दिलेला तत्पर प्रतिसाद यामुळे बारामतीकरांची दिवाळी अधिक आनंददायी होणार आहे. या सहकार्याबद्दल बारामती नगरपरिषद आणि समस्त बारामतीकरांच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले आहेत.