युवा शेतकरी वळू लागले दर्जेदार पिक उत्पादनाकडे! पिकवला ३८ ते ४० कांड्यांचा दर्जेदार ऊस

युवा शेतकरी वळू लागले दर्जेदार पिक उत्पादनाकडे! पिकवला ३८ ते ४० कांड्यांचा दर्जेदार ऊस

 

बारामती : माळेगाव सहकारी साखर कारखान्या च्या कार्यक्षेत्रातील,बारामतीशहराजवळील मळद गावातील युवा शेतकरी अभयसिंह राजेंद्र घाडगे यांनी यंदा दुष्काळी परिस्थिती आणि पाण्याची तीव्र टंचाई असतानाही ३८ ते ४० कांड्यांचा आणि पूर्ण वाढलेला अत्यंत दर्जेदार उत्तम प्रतीचा ऊस उत्पादित केला आहे.    

     घाडगे यांच्या शेतात उसाची तोडणी सुरू असताना माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष नीतिन शेंडे,ओव्हरसीयर अनिल जगताप व चीट बॉॅय श्रीकांत जगताप यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन (उसाच्या फडात) ऊस तोडणीची तसेच चाळीस-चाळीस कांड्यांपर्यत वाढलेल्या  दर्जेदार उसाची पाहाणी केली.दुष्काळी स्थितीत ही बैलगाडीचे वजन साडेचार टनांपर्यंत भरण्याइतके उत्तम ऊसपीक घेतल्याबद्दल माळेगाव कारखान्याचे सभासद असलेल्या अभयसिंह घाडगे यांचे मनापासून कौतुक केले. दरम्यान,"माळेगाव साखर कारखान्याचे उपाध्यक्ष नीतिन शेंडे यांनी प्रत्यक्ष आमच्या शेताला भेट देऊन आमच्या या ऊस उत्पादनाबाबत केलेले कौतुक आमच्यासाठी प्रेरणादायी आहे अशी भावना सभासद राजेंद्र घाडगे व दिलीप घाडगे यांनी व्यक्त केली. या प्रसंगी प्रगतशील बागायतदार आत्माराम तात्या गावडे, नानासाहेब गावडे,चारुदत्त गावडे आदी उपस्थित होते.