बारामती विमानतळाच्या विकासकामांसाठी ६५ कोटी मंजूर
सोमवार, २ नोव्हेंबर, २०२६
Edit
पुणे : बारामती विमानतळाच्या विकासा साठी६५कोटी रुपयांच्या पहिल्या टप्प्यातील कामांना शासनाने मंजुरी दिली आहे. या निधीतून धावपट्टीचे नूतनीकरण, धावपट्टी व सुरक्षा क्षेत्राची उभारणी, संरक्षक भित आणि हवाई वाहतूक नियंत्रणासाठी (एटीजी) टॉवर उभारण्याची कामे केली जाणार आहेत. त्यामुळे बारामती विमानतळावरील पायाभूत सुविधा विकसित करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल पडले आहे.
भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी दीपक उर्मिल शिव कपूर यांनी 'एक्स' या समाज माध्यमावरून ही माहिती दिली.बारामती विमानतळाच्या विकासासाठी प्रयत्न सुरू होते. त्यानंतर पहिल्या टप्प्यातील विकासकामांना शासनाची मंजुरी मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.