बारामती एसटी आगारातील देवकाते इंधन चोरी प्रकरणी निलंबित
सोमवार, २१ ऑक्टोबर, २०२४
Edit
बारामती :- लोणी काळभोर पोलिसांनी इंधनचोरांवर केलेल्या कारवाईत बारामती आगारातील सहाय्यक कारागीर बाबासाहेब माणिक देवकाते (रा.निमगाव केतकी ता.इंदापूर)याचा सहभाग आढळल्याने एस.टी.च्या विभा गीय वाहतूक अधीक्षकांकडून त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
लोणी काळभोर परिसरात इंधनमाफिया तयार झाले आहेत. लोणी पोलिसांनी यातील काहीं जणांवर संघटित गुन्हेगारी अधि नियमासह अन्य कलमांन्वये गुन्हा दाखल करत अटक केली होती.त्यावेळी टोळी तयार करून हे उद्योग केले जात असल्याचे समोर आले. श्रीकांत उर्फ सोन्या सुंबेला याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पुढील तपासात आरोपींची संख्या वाढत लोणी काळभोर परिसरात जाऊन ती १४ वर पोहोचली.तपासात पोलिसांनी ८ ऑक्टोबर रोजी देवकाते याला अटक केली त्यानंतर व दरम्यान खडबडून जागे झालेल्या एस.टी. महामंडळाने देवकातेवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्याला निलंबित करत असल्याचे आदेश सक्षम प्राधिकारी तथा विभागीय वाहतूक अधीक्षक गोविंद जाधव यांनी काढले आहेत. यामुळे देवकातेला बारामती एसटी आगारात दररोज समक्ष येवून हजेरी द्यावी लागणार आहे, यामुळे एसटीतील कर्मचाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
देवकातेला दररोज हजेरी
पोलिसांना देवकाते याचे नाव गुन्ह्यात निष्पन्न झाले असून त्यामुळे खळबळ उडाली असून बारामतीतील आणखी कोणाचा यात सहभाग आहे. का ? याचा तपास आतां पोलिस करत आहेत. निलंबन कालावधीत देवकाते याला रोज बारामती आगारात हजेरी बंधनकारक आहे.