
फटाके, शोभेची दारू विक्री दुकानांपासून १०० मीटर परिसरात धुम्रपानास मनाई
शुक्रवार, १८ ऑक्टोबर, २०२४
Edit
बारामती:- बारामती उपविभागात सुरक्षिततेच्या दृष्टीने शोभेची दारू, फटाके व त्यांचा केलेला साठा याबाबत आवश्यक ती दक्षता घेण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी निर्गमित केले आहेत.
शोभेची दारु आणि फटाके व साठा केलेल्या दुकानापासून १०० मीटर परिसरात धुम्रपान करु नये, कोणत्याही प्रकारचे दारु काम करु नये, कोणत्याही प्रकारचे फटाके उडवू नयेत, कोणत्याही प्रकारच्या शोभेची दारुचे रॅकेट परिक्षणासाठी उडवू नयेत.
हे आदेश बारामती उपविभागात ३ नोव्हेंबर २०२४ पर्यंत लागू राहतील. या आदेशाचे उल्लघंन करणाऱ्या व्यक्तींवर मुंबई पोलीस कायदा १९५१ च्या कलम १३१ अन्वये कारवाई करण्यात येईल, विस्फोटक नियम २००८ कलम नियम ८४ पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी, असेही प्रसिद्धीपत्रकान्वये कळविण्यात आले आहे.