अल्पवयीन मुलीचा विनयभंग ; दोघांवर पॉक्सो अंतर्गत कारवाई

अल्पवयीन मुलीचा विनयभंग ; दोघांवर पॉक्सो अंतर्गत कारवाई

 


बारामती:- सोमेश्वरनगर  अल्पवयीन मुलीस कॉलेजमध्ये जात 'मिकी माउस कशी आहेस ?.. तू मला आवडतेस' असे म्हणून लज्जास्पद,अश्लील हावभाव करणाऱ्या दोघां जणांवर वडगाव निंबाळकर पोलिसात याबाबत १७ वर्षीय पीडितेने फिर्याद दिली आहे.अविनाश नानासाहेब पवार (रा.वाणेवाडी) तुषार सुरेश गुलदगड (रा. पळशी) अशी त्यांची नावे आहेत. याबाबत १७ वर्षीय मुलीने पोलिसांत फिर्याद दिली आहे.

      याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,संबंधित मुलगी एका कॉलेजच्या इमारतीतून जात असताना पवार याने तिला 'मिकी माउस कशी आहेस? तू मला आवडतेस' असे म्हणून अश्लील,लज्जास्पद हावभाव केले.पीडितेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन त्याने केले. वाणेवाडीचा पवार सुमारे एक वर्षापासून व पळशी येथील गुलदगड हा मागील सहा महिन्यां पासून या मुलीचा पाठलागकरून अश्लील इशारे,अश्लील टोमणे मारून वारंवार त्रास देत होते. त्याला कंटाळून मागील दोन महिन्यांपासून फिर्यादीने एसटी बसमधून प्रवास करणे बंद केले होते.या दोघांच्या भीतीमुळे ती महाविद्यालयाच्या शिक्षकासोबत त्यांच्या गाडीतून कॉलेजमध्ये येत जात होती.

     एका आरोपीने त्यानंतर कॉलेजमध्ये येऊन तिला त्रास देण्यास सुरुवात केली.यामुळे मुलीच्या मानसिक स्थितीवर दुष्परिणाम झाला. घडणाऱ्या त्रासदायक प्रकाराला कंटाळून  तिने कॉलेजमधील गैरप्रकार प्राचार्य व शिक्षकांना सांगितला, त्यानंतर पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली असून पोलिस पुढे काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.