
डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसाहतीत ९६ कुटुंबांना मिळाली हक्कची घरे !
सोमवार, २१ ऑक्टोबर, २०२४
Edit
बारामती:- बारामती मधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसाहत मोडकळीस आल्यामुळे ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व खासदार सुप्रिया सुळे यांनी सदर इमारत ही ९६ घरांसाठी म्हाडा योजनेतू बांधण्याचा निर्धार केला. त्यामध्ये इमारत ही दर्जेदार व रुबाबदार बांधण्याचा संकल्प करून ती पूर्ण करण्याचा विडा उचलला या
सर्व जबाबदाऱ्यांमध्ये स्थानिक नगरसेवक बिरजू मांढरे यांचा देखील सहभाग आहे.
आमराई भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत हि मोडकळीस आल्यामुळे तेथील रहिवाशांना जीवितास मोठाच धोका निर्माण झाला होता. या गोष्टीचे गांभीर्य ओळखून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सदरची जीर्ण व धोकादायक इमारत पाडून त्या ठिकाणी नवीन इमारत बांधली आणि अखेर ती रहिवाशांना राहण्यासाठी दिली आहे.यामुळे येथील रहिवाशांमध्ये आनंद व समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या रहिवाशांना अनेक वर्ष् पासून जळोची येथे हलाखीच्या, त्रासदायक परिस्थितीत रहावे, वावरावे लागले. त्या ठिकाणी बारामती नगरपरिषदेने त्यांना शेड तयार करून रहाण्याची देखील सोय केली होती.परंतु उन,वारा,पाऊस या सर्वगोष्टींवर मात करीत ९६ कुटुंबांनी पाच ते सात वर्ष अतिशय भयंकर परिस्थितीत दिवस काढले. यासाठी संबंधित स्थानिक नगरसेवक बिरजू मांढरे यांचा देखील या ९६ कुटुंबांना मोठा आधार मिळाला असून अखेर डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसाहत या नावाने उभा असले ल्या सात मजली इमारतीमधील ९६ घरांमध्ये या ९६ कुटुंबियांचे पुनर्वसन करण्यात आले.दिवाळी सणाच्या तोंडावर नवीन घरात रहायला मिळाले म्हणून या सर्वच कुटुंबांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.