तु.च.महाविद्यालयाची शरयू जगताप भारतीय नेटबॉल संघात

तु.च.महाविद्यालयाची शरयू जगताप भारतीय नेटबॉल संघात

 


बारामती:- आंतरराष्ट्रीय नेटबॉल महासंघाच्या मान्यतेने बेंगलोर या ठिकाणी १३ वी आशियाई नेटबॉल अजिंक्यपद स्पर्धा भारतीय नेटबॉल महासंघ आयोजित या स्पर्धेसाठी तुळजा राम चतुरचंद महाविद्यालयाच्या शरयू जगताप हिची निवड कर ण्यात आली.भारतातून १२ खेळा डू या स्पर्धेसाठी निवडण्यात आले आहेत.

      हरियाणा या ठिकाणी २३ मार्च ते ६ एप्रिल २०२४ पर्यंत फिटनेस कॅम्प झाला असून तेलं गणा मेहबूबनगर येथे दुसरा कॅम्प २५ जून ते१५ जुलै दरम्यानझाला  आणि तिसरा कॅम्प देखील तेलंगणा मेहबूबनगर या ठिकाणी १५ ऑगस्ट ते २८ सप्टेंबर २०२४ दरम्यान घेण्यात आला. चौथा कॅम्प बेंगलोर या ठिकाणी १ ऑक्टोबर ते १६ ऑक्टोबर २०२४ दरम्यान घेण्यात आला व १७ ऑक्टोबर २०२४ रोजी भार तीय संघात निवडलेल्या खेळा डूंची घोषणा करण्यात आली. शरयू जगताप ही इ. ११ वी शास्त्र शाखेतून २०१६ साली महाविद्यलयात दाखल झाली. वरिष्ठ महाविद्यालयाच्या संघातून तिने खेळण्यास सुरुवात केली व नेटबॉल,बास्केटबॉल,कॉर्फबॉल या तिन्ही खेळ प्रकारात जिद्द, चिकाटी,सरावातील सातत्य या जोरावर अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धांसाठी सावित्री बाई फुले पुणे विद्यापीठाच्या संघात स्थान मिळविले.शरयू ने फक्त विद्यापीठ स्पर्धेबरोबरच असोसिएशनच्या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतलेला आहे.

    शरयू हिला डॉ.गौतम जाधव व प्रा.अशोक देवकर यांनी मार्गद र्शन केले. शरयू हिच्या निवडी बद्दल अनेकान्त एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जवाहर शाह (वाघोलीकर)सचिव मिलिंद शाह (वाघोलीकर)प्राचार्य डॉ. अविनाश जगताप यांनी अभिनंदन केले आहे.