
विद्यार्थ्यांना सामाजिक व शालेय शिक्षणाबद्दल पोलिसांकडून मार्गदर्शन
सोमवार, २१ ऑक्टोबर, २०२४
Edit
बारामती:- तालुक्यातील श्रीक्षेत्र मोरगाव येथील मयुरेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांना पोलीस पथकाने मार्गदर्शन केले. मोरगावात शनिवार दि.१९ रोजी रयत शिक्षण संस्थेच्या श्री मयुरेश्वर विद्यालय मोरगाव येथे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र मोहरकर व हवालदार वसंत वाघुले यांनी भेट दिली व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक रवींद्र मोहरकर यांनी विद्यार्थ्यांना स्वयंशिस्त बाळगावी, खडतर परिश्रम तसेच अभ्यास करून चांगले यश मिळवावे असे आवाहन केले. आपल्या परिसरात घडलेल्या अनेक नामांकित माजी विद्यार्थ्यांप्रमाणे आपणही अधिकारी व शासकीय सेवेत यश मिळवावे असे आवाहन केले. तसेच अलीकडच्या काळामध्ये विद्यार्थ्यांमध्ये होणारी भांडणे; मारामाऱ्या याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना सावधानतेचा इशारा दिला. विनापरवाना वाहन चालवल्यास मोठा आर्थिक दंड बसेल व पालकांनाही दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल असे सांगितले. मोबाईलचा वापर करू नये, रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी विद्यार्थी वाढदिवस साजरे करतात किंवा भांडणे होतात या प्रकारचा बेशिस्त पणा खपवून घेतला जाणार नाही असे सांगितले. असे विद्यार्थी सापडले तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल.
यावेळी प्रभारी मुख्याध्यापक रामदास बांदल यांनी आपले विद्यालय शिस्तप्रिय आहे असे सांगितले परंतु एक दोन आणणाऱ्या विद्यार्थ्यांमुळे शालेय शिस्तीला बाधा येते असे बाधा आणणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना विद्यार्थ्यांचे संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलावून घेऊन त्यांना शिस्तीचे महत्व व शिस्त पाळण्यासाठी पाल्यांना सूचना देण्यास सांगण्यात आले आहे. तसेच यापुढील काळात बेशिस्तपणा करणाऱ्या विद्यार्थ्यांवर शाळेतून कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला. याप्रसंगी प्राचार्य धनंजय खराटे ;पर्यवेक्षक महादेवआगम; प्रवीण आटोळे; विजय हाडके आम्रपाली गडवे; योगीने शेवते शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.