वृत्तपत्र विक्रेता दिन  बारामतीत उत्साहात साजरा

वृत्तपत्र विक्रेता दिन बारामतीत उत्साहात साजरा

 

बारामती शहर वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने डॉ.अब्दुल कलाम यांना अभिवादन करण्यात आले.

बारामती:- शहरातील वृत्तपत्र विक्रेत्यांचे वतीने जागतिक वृत्तपत्र दिन मंगळवार दि.१५ रोजी विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.

सुप्रसिद्ध मिसाईल मॅन डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी त्यांच्या विद्यार्थी काळात घरोघरी वृत्तपत्र पोहोच करीत,खडतर स्थितीत शिक्षण पूर्ण केले.म्हणून त्यांच्या जयंतीच्या दिवशी वृत्तपत्र विक्रेता दिन साजरा केला जातो. बारामतीमध्ये मंगळवारी पहाटे शहर वृत्तपत्र विक्रेता संघटने कडून कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून  केक कापण्यात आला.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष विजय सणस,ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते नामदेव कुंभार,प्रभाकर लांडगे-मामा,शाम राऊत,बापू गायकवाड,पांडुरंग हगवणे,सुरज चव्हाण,प्रकाश उबाळे,प्रकाश शिंदे, युवराज घुमटकर, सचिन सणस,संतराम घुमटकर,पोपट म्हेत्रे,शिवाजी जाधव,राजेंद्र हगवणे,मच्छिंद्र सायकर,रमेश दुधाळ,आप्पा घुमटकर,फैय्याज शेख,अल्ताफ नबाब,तैनुर शेख, अनिकेत धालपे,सुनील वाघमारे, गणेश शिर्के,भोलेनाथ धाईंजे, हेमंत भोसले,अमर सोनवणे  इत्यादी विक्रेते उपस्थित होते.