
सोमवार दि.२८ ला अजित पवार व २९ ला युगेंद्र पवार उमेदवारी दाखल करणार
शनिवार, २६ ऑक्टोबर, २०२४
Edit
बारामती :- बारामती विधान सभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस,भाजप,शिवसेना व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार म्हणून अजित पवार हे सोमवार दि.२८ ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
सोमवारी सकाळी१० वाजता कसबा येथून मिरवणूक सुरू होऊन शहरातील प्रमुख मार्गावरून शक्तीप्रदर्शन करीत मिरवणुकीने दुपारी १ वाजता प्रशासकीय भवनाचे निवडणूक कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.तर दु.२ वाजता श्रीक्षेत्र कन्हेरी येथे प्रचाराचा शुभारंभ व जाहीर सभा होणार आहे. बारामती विधानसभा मतदार संघातून सलग आठव्यांदा अजित पवार हे निवडणूक लढवत आहेत. बारामती लोकसभा मतदार संघाचे खासदार म्हणून कारकीर्द सुरू केलेल्या अजित पवार यांनी सलग विजय सातवेळां निवडून आले आहेत.गेल्यावेळी १ लाख ६५ हजारचे दणदणीत मताधिक्य घेत विजय मिळविला आहे.
राष्ट्रवादीचे दोन गट झाल्या नंतर ही त्यांची पहिली निवडणूक आहे.तर बारामती मतदार संघात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे वतीने अजित पवार यांचे सख्खे पुतणे युगेंद्र श्रीनिवास पवारयांचे नाव घोषित केले आहे.
ते जापली उमेदवारी २९ रोजी दाखल करणार असल्याचे जाहीर केले आहे.वंचित बहुजन आघाडी तर्फे मंगलदास निकाळजे यांना व रासपच्या वतीने श्री.संदीप चोपडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रारंभी बारामती विधानसभा मतदार संघातून दोन अर्ज दाखल झाले आहेत.