जंक्शनची उद्योगनगरी म्हणून नवी ओळख; लघु एमआयडीसीचा जागेचा प्रश्न लागला मार्गी

जंक्शनची उद्योगनगरी म्हणून नवी ओळख; लघु एमआयडीसीचा जागेचा प्रश्न लागला मार्गी

 


बारामती:- इंदापूर तालुक्या तील प्रस्तावित जंक्शन 'एमआय डीसी'साठी महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या ताब्यातील ३२८ एकर जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला हस्तांतरण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे जंक्शन व परिसराचा मोठा कायापालट होऊन जंक्शनची उद्योगनगरी म्हणून नवी ओळख निर्माण होणार आहे. यामुळे रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. तालुक्यातील तरुणांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी जंक्शन येथील 'एमआयडीसी प्रस्तावित करण्यात आली होती.
    
    बारामती-इंदापूर व वालचंद नगर- भिगवण या रस्त्याच्या चौकात जंक्शनचा चार दशकां पूर्वी उदय झाला. वालचंदनगर येथील कंपनीला सुटे भाग व यंत्रसामग्री येथील उद्योजक देत होते. अनेक उद्योजक या ठिकाणी एका छताखाली आले.मात्र सोयी सुविधा उपलब्ध नसल्याने या अडचणी येत होत्या. आता नव्याने जागा उपलब्ध झाल्याने सर्व सुविधा उपलब्ध होतील.एमआयडीसी साठी महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या ताब्यातील मौजे जंक्शन येथील २० हेक्टर ३८ आर, मौजे भरणेवाडी येथील २४ हेक्टर २४ आर., मौजे अंथुर्णे येथील २१ हेक्टर १८ आर., मौजे लासुर्णे येथील ६५ हेक्टर ७० आर. अशी एकूण १३१ हेक्टर ५० आर. एवढे क्षेत्र महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला हस्तांतरण करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या शेवटच्या बैठकीत घेण्यात आला.

जंक्शन व परिसरात सुमारे १०० उद्योजक
 असून या ठिकाणी स्वतःच्या जागेत त्यांनी व्यवसाय उभे केले आहेत.यामध्ये साखर कारखाना, सिमेंट उद्योग,मिसाइल, जहाजबांधणी, मेट्रो 'पूल यांसाठी यंत्रसामग्री तयार करुन पुरवली जाते; मात्र एमआयडीसीमुळे सर्व उद्योग एका ठिकाणी येणारआहेत. सर्व सुविधा उपलब्ध होतील तसेच या परिसराचा मोठा कायापालट होणार आहे. - विष्णू माने उद्योजक