
"माझा पक्ष,माझे वडिल " अजित पवारांच्या मुलाने एका आमदाराला थेट सुनावलं
पार्थ पवार काय म्हणाले?
अमोल मिटकरी यांनी जाहीरपणे अशा भावना व्यक्त केल्यानंतर पार्थ पवार यांनी त्यांना खडसावलं. ‘अमोल मिटकरी हे पक्षाचे विधान परिषदेचे आमदार असून त्यांनी डिझाईन बॉक्स आणि नरेश अरोरा यांच्याबद्दल बोलून पक्षविरोधी भूमिका घेतली आहे. हे दुर्देवी आहे. माझा पक्ष आणि माझे वडील अजित पवार हे अमोल मिटकरींच्या मतांशी सहमत नाहीत. त्यांना विनंती आहे की, या प्रकरणात त्यांनी अशा प्रकारची वक्तव्य करु नयेत तसेच मीडियाला बाईट देऊ नयेत’ असं पार्थ पवार यांनी त्यांच्या X वरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.
विजयानंतर आता श्रेयवादाची लढाई
नरेश अरोरा यांची डिझाईन बॉक्स ही एक पब्लिक रिलेशन एजन्सी आहे. लोकसभेतील दारुण पराभवानंतर राष्ट्रवादीकडून या पीआर एजन्सीची नियुक्ती करण्यात आली होती. या पीआर एजन्सीने गुलाबी रंगाची निवड केली. त्यानंतर राज्यभरात अजित पवार यांच्या गुलाबी जॅकेटची चर्चा सुरु झाली. राष्ट्रवादीकडून गुलाबी रंगाचा वापर आणि सकारात्मक मुद्यांभोवती प्रचार यामागे नरेश अरोरा यांच्या डिझाईन बॉक्सची कल्पना होती असं म्हटलं जातं. त्यामुळे या निवडणुकीतील विजयानंतर आता श्रेयवादाची लढाई सुरु झाल्याच दिसत आहे.