अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत विचाराने साईबाबा पालखी सोहळा बारामतीतून शिर्डीकडे रवाना !

अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत विचाराने साईबाबा पालखी सोहळा बारामतीतून शिर्डीकडे रवाना !

 


बारामती:- श्रद्धा आणि सबुरी या साई बाबांच्या वचनाने मानवी जीवन सुंदर होत असताना समाजकारणात अजित पवार यांनी सुद्धा योगदान दिल्याने आणि श्रद्धा आणि सबुरी ठेवल्याने या वेळेस त्यांना राज्याचे मुख्यमंत्री होण्याची संधी मिळावी या विचाराने २०२४ चा पालखी सोहळा साईबाबा च्या चरणी प्रार्थना करण्यासाठी गुरुवार दि.२८ नोव्हेंबर रोजी बारामती हुन शिर्डी कडे प्रस्थान केले.

बारामती ते शिर्डी असा पायी पालखी सोहळा साईच्छा सेवा ट्रस्ट चे अध्यक्ष व बारामती नगरपरिषद चे मा. उप नगराध्यक्ष बिरजू मांढरे याच्या माध्यमातून दरवर्षी आयोजित करण्यात येत असतो या वर्षी अजित पवार मुख्यमंत्री व्याहवेत या विचाराने पायी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी मा.नगराध्यक्षा भारती मूथा,मुख्यधिकारी,प्रशासक महेश रोकडे,ज्येष्ठ मा. नगरसेवक किरण गुजर,अभिजित जाधव,अभिजित चव्हाण, सुधीर पानसरे व अविनाश बांदल,डॉ सौरभ मूथा, दिनेश जगताप, शब्बीर शेख, शिर्डी चे मदन मोकाटे, जालिंदर सोनवणे,रमेश सोनवणे, तुषार थेटे, मंगेश चौधरी,मातंग एकता आंदोलन चे राजेंद्र मांढरे आदी मान्यवर उपस्तीत होते.