
सर्वपक्षीय प्रतिनिधींनी शरद पवारांशी केली प्रभाग रचनेबाबत चर्चा
बारामती :- नगरपरिषदेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकी च्या अनुषंगाने बारामती नगर परिषदेची प्रभागरचना करताना त्यात कोणावरही अन्याय होऊ नये,अशी मागणी सर्वपक्षीय प्रतिनिधींकडून राष्ट्रवादी पवार गटासह सर्वपक्षीय प्रतिनिधींनी ज्येष्ठ नेते खा.शरद पवार यांच्या कडे करण्यात आली.
रविवार दि.८ रोजी यासंबंधी 'गोविंदबागेत पवार यांची भेट घेण्यात आली. या शिष्टमंडळात माजी विरोधी पक्षनेते सुनील सस्ते,राष्ट्रवादीचे ॲड.अशोकराव
इंगुले,बसपाचे काळुराम चौधर, मनसेचे ॲड.सुधीर पाटसकर, 'भाजपचे सुजित वायसे, एमआयएमचे फैय्याज शेख, राष्ट्रवादीचे संदीप गुजर, युवका ध्यक्ष सत्यव्रत काळे,वंचित बहु जन युवा आघाडीचे मंगलदास निकाळजे,काँग्रेसचे वीरधवल गाडे,शिवसेना(उबाठा) ॲड. राहुल शिंदे,रिपाइंचे रवींद्र सोन वणे,रासपचे ॲड.अमोल सात कर,अभिजित कांबळे आदी पदाधिकारी,निवडणूक उत्सुकांचा समावेश होता.या प्रसंगी युगेंद्र पवार उपस्थित होते.
प्रभागरचनेत लोकसंख्या व भौगोलिक स्थितीच्या निकषांचे पालन केले जात नाही म्हणुन दलित,अल्पसंख्याक व वंचित समाजाच्या राजकीय प्रतिनिधित्वावर परिणाम झाल्याचे खा.पवार यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदनात असेही म्हटले आहे की, शहरातील कांही भागांमध्ये एकाच समाजाचे एकत्रित प्रभाग तयार करून निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न झालेला आहे. काही भागांमध्ये प्रभाग रचनेचे कसलेही व कोणतेही संकेत न पाळता मनमानी विभागणी
करण्यात आली आहे.त्यामुळे
समाजाच्या न्याय्य प्रतिनिधित्वास बाधा निर्माण झाली आहे.हे सर्वपक्षीय पदाधिकारी विविध राष्ट्रीय नेत्यांच्या भेटी घेणार आहेत.
शिष्टमंडळाने खा. शरद पवार यांना विनंती केली की,त्यांनी स्वतः या मुद्यांकडे गांभीयनि लक्ष देऊन निवडणूक आयोगाशी चर्चा करून नव्याने व न्याय्य पद्धतीने प्रभागरचना करावी ; जेणेकरून वंचित समाजाचा आवाज दबला जाणार नाही. दरम्यान, खा.शरद पवार यांनी शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेत आवश्यक तेथे प्रशासनाशी बोलू,असे सांगितले.