जुन्या नव्यांचा ताळमेळ साधण्याचा प्रयत्न; अजित पवार गटाच्या नीलकंठेश्वर पॅनलचे उमेदवार जाहीर! ‘ब’ वर्गातून अजित पवार उमेदवार

जुन्या नव्यांचा ताळमेळ साधण्याचा प्रयत्न; अजित पवार गटाच्या नीलकंठेश्वर पॅनलचे उमेदवार जाहीर! ‘ब’ वर्गातून अजित पवार उमेदवार

 

बारामती: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी अजित पवार गटाच्या नीलकंठेश्वर पॅनलचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजवर्धन शिंदे यांनी उमेदवारांची यादी जाहीर केली. यावेळी विद्यमान चेअरमन केशवराव जगताप, पुणे जिल्हा बँकेचे संचालक संभाजी होळकर उपस्थित होते.

मागील संचालक मंडळातील सात संचालकांना पुन्हा संधी देण्यात आले आहे. नीलकंठेश्वर पॅनल मध्ये जुन्या नव्यांचा ताळमेळ साधण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. अजित पवार स्वतः ब वर्गातून उमेदवार राहिले आहेत.

निळकंठेश्वर पॅनलचे उमेदवार पुढीलप्रमाणे

माळेगाव गट नंबर एक
वाळासाहेव पाटील तावरे
रणजीत उर्फ शिवराज प्रतापसिंह जाधवराव
राजेंद्र सखाराम वुरुंगले

पणदरे गट नंबर दोन
तानाजी तात्यासो कोकरे
स्वप्नील शिवाजीराव जगताप
योगेश धनसिंग जगताप

सांगवी गट नंबर तीन
विजय श्रीरंगराव तावरे
विरेंद्र अरविंद तावरे
गणपत चंदरराव खलाटे

खांडज-शिरवली गट नंबर चार
प्रताप जयसिंग आटोळे
सतीश जयसिंग फाळके

निरावागज गट नंबर पाच
जयपाल निवृत्ती देवकाते
अविनाश गुलाबराव देवकाते

बारामती गट नंबर सहा
नितीन सदाशिव सातव
देविदास सोमनाथ गावडे

ब वर्ग सहकारी उत्पादक, बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था
अजित अनंतराव पवार

अनूसूचित जाती/जमाती
रतन कुमार साहेबराव भोसले

महिला राखीव प्रतिनिध
संगीता बाळासाहेब कोकरे
ज्योती मच्छिंद्रनाथ मुलमुले

इतर मागास प्रवर्ग
नितीन वामनराव शेंडे

भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास
विलास ऋषिकांत देवकाते.