बारामती नगरपरिषद बारामती

बारामती नगरपरिषद बारामती

 

बारामती:- बारामती नगरपरिषद हद्दीतील सर्व नागरिक,व्यावसायिक व  विक्रेते यांना कळविण्यात येते की,बारामती नगरपरिषदेमार्फत निरा डावा कालवा कि.मी.७६ ते ७९मधील जागेतील वीरसावरकर जलतरण तलावाजवळ,बाल विकास मंदिरलगत,गरुड बाग, जवाहर बाग,नटराज नाट्यकला मंदिरा जवळ व साठवण तलावा जवळ असणाऱ्या एकूण ३२ गाळ्यांसाठी दि.१३ जुन २०२५ रोजी ई-लिलाव प्रक्रियेद्वारे गाळे भाडे तत्वावर देणेसाठी जाहीर लिलाव सूचना प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.सदरहू लिलाव प्रक्रियेत भाग घेऊन दस्तऐवज अपलोड व जमा करण्याची मुदत सोमवार दि.३०/०६/२०२५रोजी पर्यंत आहे.सदरहू गाळे ना-परतावा अधिमुल्य रकमेचा जाहीर ई-लिलाव करून भाडे तत्वावर दिले जाणार आहेत. 

     तरी सदरहू लिलावासाठी फक्त बारामती नगरपरिषद हद्दीत राहणारे सर्व नागरिक व विक्रेते पात्र ठरणार असल्याने यांनी ई-लिलाव प्रक्रियेमध्ये भाग घेऊन आपल्याला अपेक्षित असणारी लिलाव बोली रक्कम नमूद करून या प्रक्रियेत सहभाग घ्यावा.याबाबत अधिक माहिती साठी बारामती नगरपरिषद, जागाभाडे विभागाशी संपर्क साधावा.

(पंकज अनिल भुसे) मुख्याधिकारी गट-अ बारामती नगरपरिषद, बारामती.