अजित पवारांनी एकाच सभेत वार फिरवलं ! माळेगावचे चेअरमन होणार उपमुख्यमंत्री अजित पवार; माळेगावच्या निवडणुकीत आला मोठा व्टीस्ट

अजित पवारांनी एकाच सभेत वार फिरवलं ! माळेगावचे चेअरमन होणार उपमुख्यमंत्री अजित पवार; माळेगावच्या निवडणुकीत आला मोठा व्टीस्ट

 

बारामती:- माळेगांव सहकारी साखर कारखान्यांचा चेअरमन स्वतः अजित पवारच होणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी माळेगांव साखर कारखान्याचा चेअरमन प्रचाराच्या शुभारंभाचे वेळी जाहीर करणार असे सांगितले होते.आज उपमुख्यमंत्री अजित पवारच स्वतः चेअरमन होणार असल्याची घोषणा दस्तुरखुद्द अजित पवार यांनी केली.आणि उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

   पुढे बोलताना अजित पवार यांनी प्रपंचाच्या ठिकाणी वाद, मतभेद बाजूला ठेवा.कुणी गडबड केली तर "आताच एकवीस उमेदवारांची राजीनामे घेतले आहेत" चेअरमनचे नाव जाहीर करणार आहे. मला काही जण म्हणाले होते,अस होईल ; तसं होईल! मी करणारच आहे, चेअरमनच नाव जाहीर ! अस सांगत अजित पवार यांनी नाव जाहीर केलं.

       पुढे बोलतांना पवार यांनी माळेगांवच भल करायचं असेल तर अजित पवारच करू शकतो. कारखानदारी अडचणीत आहे. आपल्या वाडवडिलांनी उभी केलेली कारखानदारी कुणाच्या हातात द्यायची तर अजित पवारच्या हातात द्यायची.तुम्ही कारखान्यावर आला नाही पाच वर्षे ! तुम्ही कारखान्याचे ड्रायव्हर वापरता ते कस जमत ? अशी टीका विरोधकांवर केली.

      पुढे बोलताना पवार म्हणाले, तुम्ही मला आठ वेळा आमदार म्हणून निवडून दिलेलं आहे. एकदा खासदार केलं आहे. पहाटे जनतेची कामे करत असतो.अजित पवार यांनी फॉर्म कां भरला ? तुमच्या कां पोटात दुखतंय ? तुम्हाला आता मुद्दा राहिला नाही,खोटं बोलायला. समोरासमोर या. 

   आतां होणाऱ्या संचालकांना मोटारगाडी,हॉटेलच बिल मिळणार नाही.मी कुणी चुकलं तर काय करतो हे सर्वांना माहिती आहे.पुरंदरने पण बघितल आहे आणि तसचं ते शिरूरने पण बघितलं आहे.विरोधक वडील धारी आहेत म्हणून आदर करतो. इथं बसलेल्या सगळ्यांनी पॅनल टू पॅनल मतदान करा. माझ्याकडे बघून मतदान करा.तुमचा चेअरमन मीच होणार आहे असं अजित पवार यांनी यावेळी सांगितले.