
पचही वर्षे मीच माळेगाव कारखान्याचा चेअरमन - अजित पवार
■ लाथ मारीन तिथं पाणी काढण्याची हिंमत फक्त माझ्यात
■ कारखान्याला सोन्याचे दिवस आणणार
■ पुढील पाचही वर्षात माळेगावचा राज्यातील पहिल्या पाच कारखान्यांमध्ये समावेश करून
■ उच्चांकी उसाला दर देण्याचा निर्धार
बारामती:- शिवनगर येथील दि माळेगाव साखर कारखान्याचं भलं करायचं असेल तर अजित पवारच करू शकतो असं सांगतानाच लाथ मारीन तिथं पाणी काढण्याची हिंमत फक्त माझ्यात आहे.म्हणूनच कारखान्याची सत्ता माझ्या हातात द्यायचा निर्धार माळेगाव च्या सभासदांनी करावा,असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. जोपर्यंत माझे हातपाय चालतात तोपर्यंत
तुमचं भलंच करणार असंही सांगायला ते विसरले नाहीत. माळेगाव कारखान्याचा चेअरमन आपणच होणार असल्याची घोषणा केली. पुढील पाचही वर्षात माळेगावचा राज्यातील पहिल्या पाच कारखान्यांमध्ये समावेश करून उच्चांकी उसाला दर देण्याचा निर्धार बोलून दाखवताच सभासदांनी प्रचंड टाळ्यांच्या गजरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घोषणेचे जोरदार स्वागत केले.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निळकंठेश्वर पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ अजितदादांच्या हस्ते पाहुणेवाडी येथून करण्यात आला. यावेळी ॲड.केशवराव जगताप, बाळासाहेब तावरे, राजवर्धन शिंदे,संभाजी होळकर, सुनील पवार, दत्तात्रय येळे, रवींद्र माने, संजय कोकरे, दीपक तावरे, करण खलाटे,ॲड. राहुल तावरे आदी मान्यवर उपस्थित होते. अनेकजण म्हणतात मी सहकार संपवला. मला सहकार संपवाय चा असता तर बारामतीतील सहकारी संस्थांना वेगवेगळ्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला असता का ? असा सवालही अजितदादांनी विरोधकांना केला. विरोधक नेहमी खोटे बोलण्यात आघाडीवर असतात, माझ्यावर नेहमी बेछूट आरोप करतात, खोटे बोल पण रेटून बोल अशी त्यांची नेहमीची सवय आहे. अजितदादा कामाचा माणूस आहे हे सर्व महाराष्ट्राला माहीत आहे, त्यामुळे विरोधकांच्या आरोपांना मी भीक घालत नाही.
बारामतीचा आमदार म्हणून राज्यात फिरत असतो. माळेगाव कारखान्यात मीच चेअरमन झालो तर कोणतं काम अडेल का ? मीच माझ्यासोबत ४० आमदार निवडून आणले आहेत.
कारखान्यालाही शिस्त आल्याशिवाय राहणार नाही
●१●
मी स्वतः चेअरमन असल्यानंतर कारखान्यालाही शिस्त आल्या शिवाय राहणार नाही, असेही अजितदादांनी यावेळी नमूद केले.कांहीजण म्हणतात राज्यात उपमुख्यमंत्री असलेले संचालक होतायत.मी संचालक झालो म्हणून बिघडलं कुठं, मलाही संविधानाने दिलेला अधिकार आहे.
●२●
जोपर्यंत माझे हातपाय चालतात तोपर्यंत तुमचं भलंच होईल. ज्या दिवशी मला वाटेल बारामतीकरांना माझ्यापेक्षा चांगला माणूस मिळाला तेव्हा मी स्वतःहून बाजूला होईल, असंही अजितदादांनी यावेळी स्पष्ट केलं.