माळेगाव कारखाना निवडणुक : निलकंठेश्वर पॅनेलच्या आज चार सभा

माळेगाव कारखाना निवडणुक : निलकंठेश्वर पॅनेलच्या आज चार सभा

 

बारामती:- माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आज सोमवार दि. १६ जून रोजी कार्यक्षेत्रात चार सभा होणार आहेत. माळेगावच्या कार्यक्षेत्रातील मळद, गुणवडी, मेखळी, निरावागज येथे या सभांचं आयोजन करण्यात आलं आहे. या निमित्तानं अजितदादा सभासदांशी काय संवाद साधतात याकडे लक्ष लागलं आहे.

माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत प्रथमच अजितदादांनी स्वत: ब वर्गातून अर्ज दाखल केला आहे. त्यांनी माळेगावचे अध्यक्षपद आपण स्वत:कडेच ठेवणार असल्याचं जाहिर केलं. त्यानंतर आता माळेगावच्या कार्यक्षेत्रात अजितदादांच्या उपस्थितीत प्रचार सभांचं आयोजन करण्यात आलं आहे.

आज सोमवारी दि. १६ जून रोजी दुपारी ३ वाजता मळद येथील सिद्धराज मंगल कार्यालयात, ४.३० वाजता गुणवडी येथील अनुसया मंगल कार्यालय, सायंकाळी ६ वाजता मेखळी येथील नाना पाटील कॉम्पलेक्स, सायंकाळी ७.३० वाजता निरावागज ग्रामपंचायत कार्यालयासमोर या सभा होणार आहेत.

या सभांना अधिकाधिक सभासद, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावं असं आवाहन प्रचारप्रमुख केशवराव जगताप, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजवर्धन शिंदे, जिल्हा बॅंकेचे संचालक संभाजी होळकर यांनी केले.