
बारामती नगर परिषदमध्ये विविध पदांसाठी भरती; जाणून घ्या अर्जप्रक्रिया...
बारामती:- बारामती नगरपरिषद, शिक्षण मंडळ (बारामती नगरपरिषद) द्वारे जून 2025 मध्ये शिक्षक (पुरुष/महिला), दाई – आया (महिला) पदांच्या एकूण 26 रिक्त जागांसाठी भरती होणार आहे.
यासाठी इच्छुक उमेदवारांनी 9 जून 2025 रोजी सकाळी 11:00 वाजता शारदा प्रांगण बारामती नगर परिषद शाळा क्र, 7 येथे मुलाखतीसाठी बायोडाटा आणि आवश्यक कागदपत्रांसह हजर राहावे. बारामती नगरपरिषद, पुणे यांच्यामार्फत ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
बारामती नगरपरिषद अंतर्गत शिक्षक आणि दाई पदांसाठी भरती होणार आहे. बारामती नगरपरिषद, शिक्षण मंडळ (बारामती नगरपरिषद) यांच्या जाहिरातीनुसार एकूण २६ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी बारामती नगरपरिषदेच्या अधिकृत वेबसाईट baramatimunicipalcouncil.in वर जाऊन अधिक माहिती जाणून घेऊ शकता.
- उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल.
- मुलाखतीची तारीख 9 जून 2025 असून सकाळी 11:00 वाजता मुलाखत सुरू होईल.
- पदाचे नाव: शिक्षक (महिला), दाई, कला शिक्षक (पुरुष/महिला).
- रिक्त पदे: 26 पदे.
- नोकरी ठिकाण: बारामती.
- निवड प्रक्रिया: मुलाखत.
- मुलाखतीची तारीख: 09 जून 2025.
- मुलाखतीची पत्ता: शारदा प्रांगण बारामती नगर परिशद शाळा क्र, 7
शैक्षणिक पात्रता :
शिक्षक (महिला) पदासाठी मॉन्टेसरी कोर्स किंवा प्राथमिक कोर्स किंवा एचएससी, डी. एड उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. दाई पदासाठी 7 वी पास असणे आवश्यक आहे. कला शिक्षक (पुरुष/महिला) पदासाठी एडीडी (Art Teacher Diploma) आवश्यक आहे. निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होईल. मुलाखतीचे ठिकाण शारदा प्रांगण, बारामती नगर परिषद शाळा क्र. 7 हे आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.